नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाविरनगर येथे 80 हजारांचे 3 लाख 50 हजार रुपये घेवून अजून 2 लाख रुपये देणे आहे असा प्रकार करणाऱ्याविरुध्द सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. रुपेशसिंह अशोेकसिंह चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 मे 2020 ते 12 सप्टेंबर 2025 दरम्यान त्यांनी करणसिंघ गाडीवाले यांच्याकडून घेतलेल्या 80 हजार रुपयानंतर 24 महिन्यात 13 टक्के दराने व्याज दिले होते. आजपर्यंत करणसिंघला 3 लाख 50 हजार रुपये देवून सुध्दा अजून 2 लाख देणे आहे असे सांगून करणसिंघ गाडीवाले हा त्यांना जिवेमारण्याची धमकी देत होता. शिवाजीनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 342/2025 प्रमाणे दाखल केला असून महिला पोलीस उपनिरिक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,657 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 5 लाखांपेक्षा जास्त किंमतीचे सोन्याचे बिस्कीट चोरले ; टाटा कंपनीच्या साहित्याची चोरी ट्रक उलटून स्वस्त धान्याचा तांदुळ रस्त्यावर आज ही गुन्हा दाखल नाही; काही पत्रकारांनी खाल्ले ‘मोदक’