कंधार (प्रतिनिधी)-12 सप्टेंबर रोजी कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलवळ टोल नाक्याजवळ एक ट्रक पलटला त्यात तांदुळ भरलेला होता आणि हा तांदुळ स्वस्त धान्य दुकानाचा असल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत कंधार पोलीसांनी आज वृत्तलेपर्यंत तरी गुन्हा दाखल केला नाही. याप्रमाणे कंधारच्या काही पत्रकारांनी मोदक खाल्ल्याची चर्चा सुरू झाली आहे.

परवा 11 सप्टेंबर रोजी कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलवळ टोल नाक्याजवळ सकाळी पाच वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक PB 04 AF 8448 उलटला. त्यात तांदुळ भरलेला होता. तांदुळ सुध्दा खाली सांडला. तो तांदुळ पाहणाऱ्यांनी सांगितले की, हा तांदुळ स्वस्त धान्य दुकानाचा आहे. हा ट्रक जाम-जळकोट ते नांदेड असा प्रवास करत होता. नांदेडमध्ये स्वस्त धान्याचे धान्य खरेदी करणाऱ्या एका धान्य माफीयाकडे येणार होता. या प्रकरणात कंदर पोलिसांनी आज 13 सप्टेंबर पर्यंत वृत्तही पर्यंत तरी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता,असे सांगण्यात आले या ट्रक मधील तांदूळ रस्त्यावर पडल्यानंतर तलाठ्याने त्याचा पंचनामा केल्याचे सांगण्यात येत आहे. हा तांदूळ मुखेड येथील पदाधिकाऱ्यांच्या शाळेचा असल्याची चर्चा पण सुरू आहे. ट्रक चालक मी जखमी आहे असे सांगून तिथून गायब झाला आहे. एक अज्ञात व्यक्तीने कंधार मधील काही पत्रकारांना 4-5 मोदक दिल्याची चर्चा आहे. पत्रकार मोदकांचा आनंद घेत आहेत. कंधार शिवसेना उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक आणि मुखेड तालुकाप्रमुख उमेश पाटील अडलूरकर यांनी कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर गोरे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु या प्रकरणातील सत्य मात्र अद्याप समजले नाही. प्रक्रिया झाली आहे कमीत कमी वाहनाच्या अपघाताची नोंद तरी होणे आवश्यक होते. सध्या रस्त्यावर पडलेला तांदूळ गोदाम मध्ये ठेवण्यात आला आहे,असे सांगितले जात आहे. पण ज्या पोलिसांवर सत्य जगासमोर आणण्याची जबाबदारी आहे ते हे सत्य उघड करतील काय? हा मोठा मुद्दा आहे. कारण ज्या व्यापाऱ्याकडे हा गहू येणार होता त्याचेआणि त्याच्या नातलगांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत अत्यंत गोड संबंध आहेत.

