भंते बोधीधम्मो यांची धम्मदेसना; सुत्रपठन; उपोसत धारकांसह चारीका; दानपारामिता; समता सैनिक दलाचे साप्ताहिक परेड
नांदेड (प्रतिनिधी): –जिल्ह्यातील तपोवन बुद्ध भुमी गोळेगाव येथे वर्षावासातील श्रावण पौर्णिमेनिमित्त रविवारी दि. ७ सप्टेबंर रोजी सकाळी ठीक ९:३० वा. समता सैनिक दलाचे साप्ताहिक परेड, पुज्यनीय भंते बोधीधम्मो यांच्याकडून सुत्रपठन, त्यानंतर उपोसत धारकांसह चारीका होणार आहे. व श्रध्दावान बौद्ध उपासक उपासिका व बालक बालिका यांना भोजन दान होईल. त्यानंतर भंते यांची धम्मदेसना व पारामिता या सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, मागिल प्रत्येक पौर्णिमेप्रमाणे भंते बोधीधम्मो यांच्या माध्यमातून तपोवन बुद्ध भुमी गोळेगाव ता.लोहा जिल्हा नांदेड येथे यावेळी ही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन, यावेळी पुज्यनीय भंते यांचा वर्षावास सुरु असुन, या कालावधीत अधिष्ठान करत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका व उपोसत धारकांनी तसेच भारतीय बौद्ध महासभा सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन भंते बोधीधम्मो यांनी केले आहे.
भारतीय बौद्ध महासभा नांदेड द व लोहा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने समता सैनिक दलाचे साप्ताहिक परेड यावेळी भाद्रपद पौर्णिमेनिमित्त तपोवन बुद्ध भुमी गोळेगाव येथे आयोजित केले असून, जिल्ह्यातील नांदेड, लोहा, कंधार, मुखेड, नायगाव, बिलोली, देगलुर या तालुक्यातील सर्व संरक्षण पादाधिकारी यांच्या सह सैनिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी केले आहे.
