मुखेड (प्रतिनिधी)- मुखेड तालुक्यातील आंदेगाव वाडी भोज तांडा येथील युवकाच्या खून प्रकरणात मुखेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. देशमुख यांनी तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येक आरोपीला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी सेमा गोविंद राठोड यांनी 10 ऑक्टोबर 2022 रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार त्यांचा मोठा मुलगा विनोद राठोड हा वाडी परिसरात असताना आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात विनोद राठोड गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासानंतर प्रकरण पोलीस उप निरीक्षक जी. एच. कागणे यांनी न्यायालयात दाखल केले. न्यायालयात एकूण 15 साक्षीदारांची साक्ष व पुरावे तपासण्यात आले. सदर प्रकरणाचा निकाल देताना अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपी धोंडिबा देवला राठोड, पिंटू उर्फ अंकुश बळीराम राठोड आणि काशाबाई धोंडिबा राठोड यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.या प्रकरणातील दुसरी महिला कल्पना उर्फ शामा धोंडिबा राठोडला कलम ३२४ आणि ५०६ नुसार एकवर्षाची शिक्षा आणि २ हजार रुपये रोख दंड ठोठावण्यात आला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता गजानन भिकाजी खिल्लारे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तपासात मुक्रमाबादचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. Kanthak Suryatal Post Views: 1,380 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अमेरिका-इजरायल विरुद्ध इराण: सहा हजार वर्षांच्या सभ्यतेचा जाहीर प्रतिकार नांदेड–पुणे रस्त्यावर संगीतम ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात टळला; चालकावर मद्यपानाचा आरोप, प्रवाशांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न