नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी दाभड जवळ लक्की ट्रान्सपोर्ट पेट्रोलपंपाच्या बाजूला एका पिकऍप व्हॅनने दोन दुचाकी स्वारांना धडक दिली. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे आणि चार जण उपचार घेत आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दुपारी 3.40 वाजेच्यासुमारास दाभड जवळ लक्की ट्रान्सपोर्ट व पेट्रोलपंपाच्या बाजूला हिंगोली हायवेवर एका पिकऍप गाडीने दोन दुचाकींना धडक दिली. त्यात पांडूरंग लक्ष्मण चिंतले (41) रा.बामणी ता.अर्धापूर जि.नांदेड, शंकर खंडोजी वाखरडे (65) रा.लोहगाव ता.बिलोली, उत्तम सोनबा गजभारे (55) रा.बरडशेवाळा ता.हदगाव, उत्तम केरबा गायकवाड (62) रा.कोळी ता.हदगाव आणि अरुण बळवंत चौधरी (64) रा.लोहगाव ता.बिलोली हे पाच जण जखमी झाले. त्यातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. इतरांना महामार्ग सुरक्षा पथकाने दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.
दाभड जवळ अपघातात एकाचा मृत्यू; चार जखमी
