नांदेड – आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात 1 एप्रिल 2026 पासून सुरु होणाऱ्या 114 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरीता विविध स्पर्धा परिक्षेची तयारीकरिता प्रवेश देण्यासाठी 27 मार्च 2026 तत्पूर्वी कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसुचित जमाती) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आली आहेत, असे आवाहन कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी केले आहे. प्रशिक्षण सत्रात नौकऱ्यासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करून घेण्यात येते तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले जाते. पात्र इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार 27 मार्च 2026 पर्यंत शैक्षणिक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत. कार्यालयाचा पत्ता आदिवासी उमेदवारांकरीता, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या बाजुस गोकुंदा ता. किनवट जि.नांदेड पिन कोड-431811 असून अधिक माहितीसाठी संपर्क दुरध्वनी क्रमांक :- 9881524643, 7219709633, 9518997868, 02469-221801 आहे. *प्रवेशाच्या अटी* उमेदवार अनुसुचित जमाती पैकी (एस.टी) प्रवर्गातील असावा. नांदेड जिल्हयातील व इतर जिल्हयातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीत कमी शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: राहाण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी तीन महिने पंधरा दिवस असुन शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदवीधरांना द.मा. 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा-उमेदवारांचे वय दिनांक 27 मार्च 2026 रोजी 18 वर्षे पूर्ण असावे व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन संबंधीत प्रशिक्षणार्थीचे बँक खातेमध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थीचे बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. आपण यापूर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा सदर प्रशिक्षण सत्र अर्ध्यातुन सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही, असेही आवाहन कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 531 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विस्तारासाठी संशोधन केंद्राची मागणी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून चालना