नांदेड(प्रतिनिधी)-आषाढी एकादशीची पहाट उजाडताच रहिमपुर, मुजामपेठ भागात 25 -30 वर्ष वयाच्या एका युवकाच्या शरिरावर अनेक घाव घालून त्याचा जिव घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. अद्याप वृत्तलिहिपर्यंत मरणारा कोण आणि मारेकरी कोणी याचा पत्ता लागलेला नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आणि इतर अनेक अधिकारी आणि पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले आहेत. रहिमपुर, मुजामपेठ या भागात जास्त करून कामगार मंडळी राहतात आणि या कामागारांमध्ये सुध्दा आता मोठी स्पर्धा लागली आहे आणि त्यातूनच या ठिकाणी नेहमी वाद होत असतात. दोन तीन वर्षापुर्वी सुध्दा एका जमावाने एका युवकाचा खून केला होता. आज आषाढी एकादशीचा सुर्योदय उगवताच रहिमपुर, मुजामपेठ भागात एक अनोळखी 25-30 वर्ष वयाच्या युवकाचे प्रेत सापडले. या युवकावर शरिराच्या अनेक ठिकाणावर जखमा केल्याचे चिन्ह दिसत आहेत. आता वृत्तलिहिपर्यंत या मरण पावणाऱ्या युवकाची ओळख पटली नाही. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा जनतेला आवाहन करत आहे की, छायाचित्रात दिसणारा वक कोणाच्या ओळखीचा असल तर त्यांनी या बाबतची माहिती नांदेड ग्रामीण पोलीसांना द्यावी. जेणे करून या अनोळखी मयताची ओळख पटेल आणि त्याचा खून करणाऱ्या गुन्हेगारांना पकडणे सहज होईल. Kanthak Suryatal Post Views: 1,262 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आ.राजेश पवारच्या विरोधात धर्माबाद जन आक्रोश मोर्चा बळेगाव शाळेच्या विद्यार्थाचा अपघात; एक ठार,दोन गंभीर जखमी