नांदेड (प्रतिनिधी) – बोले सो निहाल… सत श्री अकालच्या जयघोषात आज सचखंड श्री हजूर साहेब येथून निघालेली पारंपरिक हल्ला-महल्ला मिरवणूक अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. देशभरातून तसेच विदेशातून शेकडो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही होळी महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काल रात्री होलिका दहन पार पडले, तर आज सकाळपासून भजन-कीर्तनाच्या सुरावटीत भाविकांनी एकमेकांवर गुलाल उधळत रंगोत्सव साजरा केला.सचखंड श्री हजुर साहिबजी येथील मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी सुद्धा हल्ला महल्ला मिरवणुकीत महावीर चौका पर्यंत सहभागी झाले होते. दुपारी तीन वाजता पंच प्यारे साहिबांन यांच्या प्रार्थनेनंतर हल्ला-महल्ला मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषेत आणि निशाण साहेच्या सान्निध्यात निघालेली ही मिरवणूक शहरातील विविध मार्गांनी पुढे सरकत महावीर चौक परिसरात पोहोचली. तेथे प्रतीकात्मक हल्ल्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी बोले सो निहाल… सत श्री अकालच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ही मिरवणूक महावीर चौक, बाफना चौक, जुना मोंढा मार्ग आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा सचखंड श्री हजूर साहेब येथे परतत असते. मिरवणुकीदरम्यान भाविकांनी शस्त्रविद्येचे नेत्रदीपक प्रदर्शन सादर केले. विविध भजनी मंडळीदेखील सहभागी झाल्या होत्या. भारतासह विदेशातील शेकडो श्रद्धाळूंनी या पारंपरिक सोहळ्यात सहभाग नोंदवून उत्सवाची शोभा वाढवली. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव भक्तिभाव, उत्साह आणि शिस्तबद्धतेत संपन्न झाला. होळी आणि हल्लाबोल हल्ला या सणांसाठी शेकडो लोक येतात याची जाणीव वीज वितरण कंपनीला असताना सुद्धा आज दुपारपासून आता वृत्तप्रसारित करेपर्यंत सुद्धा गुरुद्वारा परिसरात अनेक जागी विद्युत लपलेली आहे. विचारणा केली तर वीज वितरण कंपनीने सांगितले की काहीतरी केबल बदलले जात आहे. तुम्हाला सण माहित नव्हता काय कमीत कमी सण माहित होता तर मग त्या सणाच्या दिवशी असे काही घडू नये याची जबाबदारी पार पाडणे ही वीज वितरण कंपनीची जबाबदारी होती असे नागरिक बोलत आहेत. संबंधित हल्ला महल्ला व्हिडीओ …. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-04-at-18.10.25.mp4 Kanthak Suryatal Post Views: 645 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कोणाची म्हैस आणि कोणाला उठ बैस ? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विस्तारासाठी संशोधन केंद्राची मागणी