नांदेड (प्रतिनिधि) – भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचा विस्तार करून त्या ठिकाणी अत्याधुनिक संशोधन केंद्र स्थापन करावे, तसेच पुतळ्याला तातडीने सोनेरी रंग द्यावा, अशी मागणी नगरसेवक राहुल मधुकरराव सोनसळे यांच्यासह इतर नगरसेवकांनी केली आहे. यासंदर्भात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, डॉ. आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून समता, स्वातंत्र्य व बंधुता यांचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव लक्षात घेता पुतळा परिसराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणे आवश्यक आहे. परिसरातील अतिक्रमणे हटवून जागा मोकळी करावी आणि त्या ठिकाणी ऐतिहासिक स्मारक उभारण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व संशोधन केंद्र सुरू केल्यास नांदेडचे नाव देशाच्या शैक्षणिक नकाशावर ठळकपणे उमटेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. हजारो संशोधक विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेने सकारात्मक भूमिका घेत भीम जयंतीपूर्वी संशोधन केंद्र स्थापनेबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी विनंती नगरसेवकांनी केली आहे. या निवेदनावर राहुल मधुकरराव सोनसळे यांच्यासह प्रशांत विराज इंगोले, शेख उस्म अयमान सय्यद रिजवान, सत्यपाल सावंत, परवीन बेगम शेख पाशा, सुनिता रूपकराव जोंधळे आणि राजश्री गोडबोले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. Kanthak Suryatal Post Views: 872 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ‘हल्ला-महल्ला’ मिरवणूक उत्साहात संपन्न आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना प्रशिक्षण