नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे बदलीचे वारे अद्यापही वाहण्याच्या तयारीतच आहेत. कारण काही नवीन पोलीस निरिक्षक आले आहेत. काहींना नवीन नियुक्ती हवी आहे. तर सगळ्यात महत्वाचा विषय स्थानिक गुन्हा शाखेतील खुर्चीचा पण आहे. कोण दावेदार या खुर्चीचा आणि कोण-कोणाला खो देणार याच्या चर्चा आषाढी एकादशीच्या निमित्ताने रंगल्या आहेत. या बदल्यांमध्ये पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांची काय भुमिका असेली हेच सुध्दा तेवढेच महत्वाचे आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलात बरेच नवीन पोलीस निरिक्षक आले आहेत. त्यात त्यांना अद्याप नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. ज्यांना नियुक्त्या दिल्या आहेत. त्यांच्या नियुक्त्या तात्पुरत्या आहेत असे त्या नियुक्ती आदेशात लिहिलेले आहे. त्यामुळे दिलेल्या नियुक्त्यांमध्ये सुध्दा बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. नांदेड जिल्ह्यात नव्याने आलेल्या काही पोलीस निरिक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त्या देण्यात आल्या. तात्पुरत्या हा शब्द तसा खतरनाक आहे. याचा अर्थ असा लावला जात आहे की, पुन्हा बदल होवू शकतो.
या सर्व बदल्यांमध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न किंवा महत्वाचे लक्ष नांदेड स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर आहे. काही जण सांगतात. या जागेसाठी पोलीस निरिक्षक सुर्यमोहन बोलमवाड, ओमकांत चिंचोळकर हे स्पर्धेत आहेत. पण स्पर्धा कशाची हा प्रश्न कळण्यापेक्षा पुढचा आहे. कारण स्पर्धेचा विषय नाही. ज्या व्यक्तीमध्ये त्या खुर्चीला सांभाळण्याची क्षमता असेल त्याला ती मिळालाच हवी. नाही तर मागच्या अनेक अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांना पत्रकारांची नावे सांगून तुमच्या नावांचे अर्ज दिले आहेत अशी बदनामी पण केलेली आहे. हे शब्द गुंड आहेत. त्यांना सांभाळण्याची एक मोठी कामगिरी या खुर्चीकडे असते आणि काही जणांना वरिष्ठ अधिकारी तुम्ही येल्लो जर्नलिझम करता असे सांगून त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. या सर्व जीवनातील खेळी आहेत. पण आपल्या भाकरीवर तुप ओढतांना ते इतरांना त्रास होईल असे नक्कीच नसावे.
पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करतांना पोलीस अधिक्षकांनी पोलीस उपमहानिरिक्षकांना सांगावे लागते असा दंडक आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरिक्षकांची नियुक्ती करतांना तीन अधिकाऱ्यांच्या नावाचा प्रस्ताव पोलीस उपमहानिरिक्षकांकडे पोलीस अधिक्षकांनी पाठवायचा असतो आणि त्यातील एक नाव पोलीस उपमहानिरिक्षक निवडतात अशी नियमावली आहे. परंतू नांदेड जिल्ह्यामध्ये नियुक्तीचा कारभार वेगळ्याच पध्दतीने सुरू आहे. त्यासाठी एक विशेष कक्ष विसावानगरमधील एका गडगंज श्रीमंत व्यक्तीच्या घरामध्ये तयार केलेला आहे.विसावानगरीमधील जवळपास सर्वच घरांमध्ये सीसीटीव्ही सुध्दा लावलेले आहेत. विसावानगरच्या कक्षामधील प्रभारी अधिकारी सध्या मुंबईला आहेत म्हणे. म्हणून बहुदा या नियुक्त्यांना उशीर होत असेल. परंतू या सर्वांमध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक आणि इतर पोलीस निरिक्षकांच्या नवीन नियुक्त्यांमध्ये पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप हे काय भुमिका घेतील हे सर्वात जास्त महत्वाचे आहे.
स्थानिक गुन्हा शाखेची खुर्ची कोणाच्या नशिबात ?
