नांदेड(प्रतिनिधी)-पिकांना जास्तीचा दर मिळवून देतो असे सांगून 2022 ते 2025 दरम्यान अनेक शेतकऱ्यांची 2 कोटी 27 लाख 28 हजार 577 रुपयांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांविरुध्द धर्माबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
समराळा ता.धर्माबाद येथील शेतकरी बालाजी लक्ष्मण देवकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार धर्माबाद येथील श्रीकृष्ण भुसार दुकानमधील लक्ष्मण कोंडीबा देवकर, सायन्ना गंगाराम इप्पेकर, पोतन्ना सायन्ना इप्पेकर, बालाजी सायन्ना इप्पेकर आणि संजय गंगाधर देवकर या सर्वांनी मला आणि इतर शेतकऱ्यांना मिळून तुमच्या धान्याचे भाव जास्त मिळवून देतो म्हणून शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेले सोयाबीन, हरभरा, तुर असे धान्य एकूण 2664 क्विंटल यांच्याकडे दिले. त्याची किंमत 2 कोटी 27 लाख 28 हजार 577 रुपये आहे. आपण दिलेल्या धान्याची किंमत मी आणि शेतकऱ्यांनी मागितली असता पैसे तर दिले नाहीत उलट शिवीगाळ केली. धर्माबाद पोलीसांनी पाच जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 196/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक लोणकर अधिक तपास करीत आहेत.
शेतकऱ्यांची 2 कोटी 27 लाख 28हजार 577 रुपयांची फसवणूक
