नांदेड(प्रतिनिधी)-आज आखाडी एकादशीच्या निमित्ताने शांतीदुत परिवाराने ज्येष्ठ साहित्यक प्राचार्य यशवंत जी.पाटणे यांचा सत्कार केला आणि कु.आर्या अभिजित जाधव यांना उमरगा येथे शांतीदुत विद्यार्थी पुरस्कार देवून गौरव केला.
आज सातारा येथील प्रख्यात व्याख्याते व साहित्यीक डॉ.यशवंत जी.पाटणे यांना विठ्ठल मुर्ती, शाल, तुळशी रोप देऊन सत्कार करण्यात आला. शांतीदुत परिवार पदाधिकारी यांच्या हस्ते विविध पुस्तके देवून त्यांचा गौरव करण्यात आला. आयआयटी परिक्षेत दैदिप्यमान यश मिळवलेल्या कु. आर्या अभिजित जाधव यांना शांतीदुत विद्यार्थीरत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
सुत्रसंचलनात सुप्रसिध्द असलेले प्रा.भैरवनाथ कानडे यांना तुळजापूर तालुका शांतीदुत परिवार अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र डॉ.पाटणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी शांतीदुत प्राचार्य सोम महाजन, प्रा.युसूफ मुल्ला, प्रा.जीवन जाधव, प्रा.अभयकुमार हिरास, पद्माकर मोरे, मुख्याध्यापक शाम पाटील, जितेंद्र घोटाळे, संतोष मोहिते, नितीन दुधाटे, दिव्या सुर्यवंशी, अभिजित जाधव, सौ.श्रध्दा जाधव, विजय वडदरे, अमर देशटवार, शांतीदुत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ.विद्या जाधव, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.विठ्ठल जाधव यांची उपस्थिती होती.
शांतीदुत परिवारातर्फे प्राचार्य यशवंत पाटणे आणि आर्या जाधव यांचा सत्कार
