अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेसोबत विनयभंग करून तिला चाकू दाखवत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाविरुध्द किनवट पोलीसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार 4 जुलै रोजी दुपारी एक अल्पवयीन बालिका आपल्या शाळेत जात असतांना यश चंद्रमणी कदम या युवकाने तिचा पाठलाग केला. त्याने तिच्याकडे अनेक अश्लील हावभाव करून इशारे केले. त्यानंतर तिच्या जवळजाऊन तिला सांगितले की, तु मला खुप आवडतेस, माझे तुझ्या प्रेम आहे. बालिकेने याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असतांना त्या युवकाने तिचा हात धरला आणि आपल्याकडे ओढत जाऊन नकोस असे धमकावले आणि सोबतच शाळेतील गुरुजींना घडलेला प्रकार सांगितला तर मी तुला जीवे मारुन टाकेल अशी धमकी दिली.
धमकीने घाबरलेल्या बालिकेने आज या संदर्भाची तक्रार किनवट पोलीस ठाण्यात दिल्यानंतर यश चंद्रमणी कदम विरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 79, 351(3) तसेच पोक्सो कायद्यातील कलम 8 आणि 12 नुसार गुन्हा क्रमांक 214/2025 दाखल केला आहे. किनवटचे पोलीस निरिक्षक देविदास चोपडे, पोलीस उपनिरिक्षक सागर झाडे यांनी अत्यंत जलदगती प्रभावाने घटनास्थळी भेट देवून कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेमुळे बालिकांना एकटे शाळेत पाठविणे याबद्दल आता समाजाने पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. किंबहुना लाडकी बहिण योजना राबविणाऱ्या सरकारने सुध्दा अशा घटना घडणार नाहीत यासाठी लाडक्या बालिका योजना सुध्दा राबवायला हव्यात अशी चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!