माळाकोळी,(प्रतिनिधी)- आपली आठ वर्षीय बालिका पळवून नेल्या नंतर ४८ तासात तीच शोध घेऊन सुखरूप देणाऱ्याचे ऋण फेडताना आईच्या डोळ्यातील आसवांनी आपली वाट स्वतःच शोधून घेतली. दिनांक २० जानेवारी रोजी मोहिजे परांडा गावातील एक ८ वर्षीय बालिका लिंबोटी गावातून गायब झाली.याबाबतचा गुन्हा तपासासाठी पोलीस उप निरीक्षक राणी भोंडवे यांच्या कडे देण्यात आला होता.नांदेड पोलिसांनी या संदर्भाने अत्यंत जलद कार्यवाही करून ४८ तासातच बालीकेचा शोध लावला.पुढे या बालिकेचा नरबळी दिला जाणार होता शिव धक्कादायक माहिती पोलिसांनी शोधली.बालिकेचा नरबळी देण्याची तयारी करणारे आई वडील आणि मुलगा पकण्यात आले.बालिका सुखरूप आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आली. आज त्या बालिकेचे आई वडील मोहीजा परांडाचे पोलीस पाटील बळीराम परांडे आणि मनीष विठ्ठल पाटील तसेच नामदेव विठ्ठल मोजकर आदींनी माळाकोळीचे सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांच्या सोबत नांदेडला आले आणि पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,कंधार येथील पोलीस उप अधीक्षक डॉ.अश्विनी जगताप यांचा सन्मान केला.नांदेड पोलिसांचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांच्या कडे काहीच मोठी वस्तू नव्हती.पण त्यावेळेस बालिकेच्या आईच्या डोळ्यात विसावलेले अश्रू मात्र स्वतः आपली वाट तयार करून मार्गस्थ झाले.असे फेडले ऋण. Kanthak Suryatal Post Views: 1,349 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इस्लापूर ग्रामपंचायत लिपिक पदभरतीचा निकाल देण्यासंदर्भात आमरण उपोषण.. चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित ;नांदेडमध्ये बर्ड फ्लूची लागण नाही