हाकेनी माफी मागावी अन्यथा आंदोलन तिव्र करू-रावणगावकर
नांदेड (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लक्ष्मण हाके यांच्याविरोधात तिव्र आंदोलन छेडत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. हाके यांनी ना. अजित पवार यांची जाहीर माफी मागावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांनी दिला.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कंबरच्या खालचे अपशब्द वापरल्याप्रकरणी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर हाके यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी हाकेच्याविरोधात घोषणाबाजी करून त्यांचा निषेध व्यक्त केला. हाके यांनी ना. अजित पवार यांची माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात राज्यभर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही बाळासाहेब रावणगावकर यांनी दिला. यावेळी नांदेड दक्षीणचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहसीन खान पठाण, स्वप्नील इंगळे, बालाजी शिंदे, शहर कार्याध्यक्ष विलास गजभारे, फेरोज पटेल, संदीप नवघरे, उषा मोरे, राजू कांबळे, शंकर धिर्डीकर, सुनिल धुमाळ, आत्माराम कपाटे अर्धापूर काँग्रेस अध्यक्ष, राजेश्वर देशमुख तालुका अध्यक्ष भोकर, निळू पाटील कल्याणकर तालुका अध्यक्ष हदगाव, आनंद टिपरसे तालुका आध्यक्ष मुदखेड, अभिषेक लुटे तालुका अध्यक्ष हिमायतनगर, शशि पाटील क्षीरसागर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्याकडे या मागण्याचे निवेदन देण्यात आल.