नांदेड (प्रतिनिधी) -श्री शिवाजी प्राथमिक शाळा वजिराबाद व माणिकनगर नांदेड येथे दि.9 फेब्रुवारी 2026रोजी वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव भाई गुरूनाथराव कुरूडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वैजनाथराव कुरूडे, प्रा.सौ. संध्याताई मुक्तेश्वरराव धोंडगे, डॉ. युवराज धोंडगे, प्राचार्य सुधीरभाऊ कुरूडे, उपमुअ प्रा.डॉ. मधुकरराव शिंदे, प्रा.मुख्याध्यापक नामदेव गवळे, उपप्राचार्य वसंतराव राठोड, पर्यवेक्षक सत्यवान पारेकर, रामराव गायकवाड, आनंद सुरसे, विजयसिंह परदेशी, सूर्यकांतराव विश्वासराव, श्रीकांत वानखेडे, प्रा. स्वाती कान्हेगावकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पंढरीनाथ काळे यांनी केले. डॉ. युवराज धोंडगे यांनी विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी वर्गात प्रथम येणार्या विद्यार्थ्यास पारितोषिक देण्यात यावे, असे मत व्यक्त केले. भाई गुरूनाथराव कुरूडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम पाहून सर्व शिक्षकवृंदांचे कौतुक केले. इतर मान्यवरांनीही कार्यक्रम सुंदर झाला असल्याचे प्रतिपादन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन अतिशय सुंदर कलाविष्कार सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक पंढरीनाथ काळे, सांस्कृतिक प्रमुख शहाजी आहेर, गोविंद पडूळकर, गजानन शेळगावे, अविनाश नाईक, गुरूप्रसाद विश्वासराव, अंबादास देशमुख, सौ. ऐरावती गिरे, सौ. संगीता वाखरडे, सौ. अरूणा स्वामी, सौ. अनुजा तेलंग, निलेश गायकवाड, कांताबाई नांगरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंडिबा कोनाले व श्रीमती अपर्णा लाडेकर यांनी केले, तर आभार बसवेश्वर मंगनाळे यांनी मानले. Kanthak Suryatal Post Views: 895 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation डॉ. किरण घोडके यांची एमडीसाठी निवड नांदेडमध्ये महाशिवरात्री भक्तिमय जल्लोषात साजरी: ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी शहर दुमदुमले