नांदेड (प्रतिनिधी) – शहरात सध्या LPG गॅस टंचाईची समस्या गंभीर बनली असून गॅस सिलिंडर वेळेत उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही गॅस वितरकांकडून शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा जादा रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. I.S.L.A.M. पार्टीच्या वतीने केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात तिरंगा चौक वजीराबाद, जुना कौठा, हिंगोली गेट, वाजेगाव नाका रोड, आसना, दीप नगर परिसरातील काही LPG गॅस वितरकांविरोधात आरोप करण्यात आले आहेत. निवेदनात नमूद केल्यानुसार, अनेक गॅस एजन्सीकडून वारंवार ‘No Stock’ फलक लावले जात असून नागरिकांना आणि ऑटो चालकांना तासन्तास प्रतीक्षा करूनही गॅस मिळत नाही. तीन चाकी वाहनांद्वारे वितरण सुरू असले तरी पुरवठा अपुरा असल्याने सर्वसामान्य ग्राहकांची गैरसोय होत आहे.तसेच घरपोच गॅस वितरणाच्या नावाखाली अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दररोज बदलणारे दर आणि अतिरिक्त आकारणीमुळे नागरिकांची आर्थिक अडचण वाढत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, गॅस चे दार ५९ रूप[यावरून १०० रुपये दर वाढवणाऱ्या संबंधित गॅस वितरकांवर कारवाई करून गॅसचा नियमित पुरवठा सुरळीत करावा व शासन दरानुसारच ग्राहकांकडून पैसे घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर मुस्तकीम उर्फ गुड्डू,बबलू लाला,सय्यद खादीर,शेख इरफान शेख महेमूद,आदेश गौतम गर्दने,दीपक हवान,देविदास गायकवाड,मुजमिल इनामदार,आनंद कुलदिपके, पवन गुडेवार,मारोती मुंढे,मोहमद परवेज,राजू जांभळे,संजय बाभळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. Kanthak Suryatal Post Views: 675 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड बीडीडीएस पथक मनुष्यबळाअभावी अडचणीत; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह जिल्हाधिकाऱ्यांकडे देशी बार व्यवस्थापन’ची मागणी; अर्जदारांचा प्रशासनाला अनोखा सल्ला!