नांदेड,(प्रतिनिधी)-अनुसूचित जातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र जे अगोदर ना मंजूर झाले होते.ते जात पडताळणी प्रमाणपत्र परत मिळवून देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाज स्वीकारणाऱ्या, कंत्राटी पदावर जिल्हा प्रकल्पाधिकारी समता दूत प्रकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथील सुजाता मनोहर पोहरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
मुलाच्या पुढील शिक्षणासाठी अनुसूचित जातीची जात पडताळणी होऊन वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी महिला तक्रारदाराने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्याकडे ऑनलाईन अर्ज सादर केला. तसेच 13 मार्च 2025 रोजी ऑफलाईन अर्ज पण दाखल केला. पण तो अर्ज तांत्रिक कारणांमुळे नामंजूर करण्यात आला होता त्यावेळी त्या तक्रारदार महिलेने सुजाता पोहरे यांची भेट घेतली. तेव्हा सुजाता पवार यांनी सांगितले की मी काम करत असलेल्या विभागाच्या शेजारीच जात पडताळणी विभागाचे काम चालते. माझी तेथे ओळख असून मी तुझे काम करून देते, परंतु पैसे भरल्याशिवाय काम होणार नाही तुम्ही 20 हजार रुपये टोकन रक्कम दिल्यास तुमचे काम होईल, अन्यथा काम होणार नाही अशा आशयाची तक्रार महिलेने 26 जून 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथे दिली.
या तक्रारीची पडताळणी ३ जुलै 2025 रोजी समाज कल्याण कार्यालय परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथील लोकसेविका तथा कंत्राटी जिल्हा प्रकल्प अधिकारी समता दूध प्रकल्प सुजाता मधुकरराव पोहरे यांच्या कक्षात पंचायत समक्ष झाली. महिलेच्या मुलाच्या अनुसूचित जातीची जात पडताळणी होऊन जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता एकूण 30000 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी नंतर सुरुवातीला 15000 रुपये उर्वरित पंधरा हजार रुपये जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम झाल्यानंतर द्यावे असे म्हणून लाचेची मागणी करून त्याच वेळेस तक्रारदार महिलेने दिलेले लाचेचे 15000 रुपये सुजाता पवार यांनी स्वीकारले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सुजाता पोहरेला आपल्या ताब्यात घेतले त्यांच्याकडे झालेल्या झडतीत एक मोबाईल आणि पन्नास रुपये रोख रक्कम सापडले. हडको येथील घराची सुद्धा तपासणी करण्यात आली.
सुजाता पोहरे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांनुसार विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना अटक झाली आहे. पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय तुंगार आणि पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक करीम खान पठाण पोलिस अंमलदार मेनका पवार, यशवंत दाभनवाड, ईश्वर जाधव, रमेश नामपल्ले यांनी ही कार्यवाही पूर्ण केली.