ऑपरेशन सिंदूरमधील मोठा खुलासा: मोदींच्या निर्णयामुळेच भारतीय जेट कोसळले?”

आज देशासाठी एक गंभीर आणि दु:खद बातमी मांडत आहोत.आम्हाला आपल्या देशाच्या सैन्यावर अपार अभिमान आहे. पण या अभिमानाची पूर्तता केवळ बोलण्यातून नव्हे, तर कृतीतून होणे आवश्यक आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू होताच भारतीय लढाऊ विमानांने पाकिस्थानने पडली. नेमकी किती विमाने कोसळली याबाबत आजपर्यंत सरकारने अधिकृत माहिती दिलेली नाही. लष्करानेही मौन बाळगले आहे. सीडीएस अनिल चव्हाण यांनी सुद्धा हेच स्पष्ट केले होते की, किती विमाने पडली यापेक्षा “हे का घडले?” हे अधिक महत्त्वाचे आहे.आम्हाला देखील वाचकांपुढे ही माहिती ठेवताना आकड्यांची चिंता नाही. कारण ही केवळ संख्या नाही,ती आहे आपल्या संरक्षणाची गंभीर अपयशांची साक्ष.

ऑपरेशन सिंदूरनंतर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्करी गणवेशाचे बॅनर प्रसारित करून निवडणूक प्रचार करत होते, तेव्हा त्यांनी घोषित केले की, “सैन्याला संपूर्ण मोकळीक दिली आहे.” मात्र आताच्या घटनाक्रमानंतर मोठा प्रश्न उभा राहतो — मोदी खोटं बोलत होते का? आणि का?आजही देशाच्या नागरिकांना ऑपरेशन सिंदूरबद्दल स्पष्ट माहिती नाही. संसद, विरोधी पक्ष, आणि सामान्य जनता यांना काहीच माहिती देण्यात आलेली नाही. विरोधकांनी यावेळी सरकारला पूर्ण साथ दिली होती. जनता देखील पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या निर्णयामागे ठाम उभी होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील वक्तव्य केले होते की, “भारतीय नौदलाने जर सहभाग घेतला असता, तर पाकिस्तानचे अजून चार तुकडे झाले असते.” मग प्रश्न राहत, नौदल या मोहिमेत सामील का झाले नाही? याचे उत्तर आज पर्यंत तरी देण्यात आलेले नाही.हे सर्व पाहता असे वाटते की, ऑपरेशन सिंदूरबाबत काहीतरी लपवले जात आहे.सरकारने याआधी इंदिरा गांधी आणि पंडित नेहरू यांना दोष देत आपली छवि उंचावण्याचा प्रयत्न केला. पण आता स्वतःच्या चुका स्वीकारण्याचे धाडस दाखवायला हवे. जेट विमाने कोसळली, पण सर्व वैमानिक परत आले, असे सरकार सांगते. मग शिवांगी सिंह, ही भारताची पहिली महिला फायटर पायलट कोठे आहे, याचे उत्तर का देण्यात आलेले नाही?

पाकिस्तानने भारतीय विमानं का पाडली?

यामागील कारण स्पष्ट आहे, राजकीय नेतृत्वाच्या चुकीच्या निर्णयांमुळे भारतीय वायुदलाला मर्यादित कारवाईचे आदेश देण्यात आले. पाकिस्तानच्या सीमेत न घुसता, त्यांच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला न करण्याचे आदेश सरकारकडून दिले गेले. परिणामी, तयार पाकिस्तान सैन्याने भारतीय लढाऊ विमाने पाडली.हे सांगणे आहे, कॅप्टन शिवकुमार, जे इंडोनेशियातील एका सेमिनारमध्ये बोलताना म्हणाले की, “राजकीय आदेशांमुळे आम्ही पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा प्रणालीवर हल्ला केला नाही, आणि त्यामुळेच आमची विमाने पाडली गेली.”

ही माहिती The Wire या माध्यमाने प्रसिद्ध केली. नंतर भारत सरकारने स्पष्टीकरण दिले की, “काही माध्यमांनी त्यांचे विधान तोडून मोडून दाखवले.” मात्र शिवकुमार यांचा मथितार्थ स्पष्ट आहे — राजकीय नेतृत्वाच्या चुकीमुळे देशाचे हजारो कोटींचे नुकसान झाले.या सगळ्यावर मोदी सरकारने आजवर मौन बाळगले आहे. पण लवकरच पावसाळी अधिवेशन येत आहे. तेव्हा संसदेत सरकारवर गंभीर आरोप होतील आणि त्याची उत्तरं सरकारला द्यावीच लागतील.भारत सरकारने केवळ विरोधी पक्ष नव्हे, तर १४० कोटी भारतीय जनतेशी प्रामाणिकपणे वागणे आवश्यक आहे. कारण जर सैन्याला खरी मोकळीक दिली असती, तर कदाचित पाकिस्तानला पुन्हा एकदा धडा शिकवता आला असता.

आज कॅप्टन शिवकुमार म्हणतात की, वायुदलाने नंतर स्वतः कमान हातात घेत, रणनीती बदलली आणि त्यानंतर अतिरेकी अड्ड्यांवर हल्ला करत पाकिस्तानला गुडघ्यावर आणले. मात्र त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे तीन दिवसांत युद्धविराम जाहीर झाला.सरकारने ट्रम्प कोणत्या युद्धविरामाचा उल्लेख करतात याचे उत्तर अजून दिलेले नाही.सरकारकडून लोकसभेत सांगण्यात आले की पुढच्या निवडणुकीत काश्मीरमध्ये आपले खासदार निवडून येतील. हा दावा आता खोटा वाटतो, कारण प्रत्यक्षात देशात प्रश्नांचा स्फोट झाला आहे.भारतीय वायुदलप्रमुख म्हणाले होते, “मैं जब खुद तय कर लेता हूं तो मैं अपने आप की भी नहीं सुनता।” हा वाक्यांश सिनेमातून घेतला असला तरी त्यामागची भावना ही लष्करी असंतोष दर्शवते.भारतीय हवाई दल, नौदल आणि थलसेना यांच्यात एकत्रितपणे कारवाईसाठी नियोजन आवश्यक होते. परंतु सरकारच्या अपूर्ण ज्ञानामुळे आणि अति राजकीय हस्तक्षेपामुळे ऑपरेशन सिंदूर ही एक अपयशी कारवाई ठरली ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी नव्हे तर राजकीय अपयशाची कहाणी आहे.सरकारने ही चूक मान्य करून देशासमोर सत्य मांडावे आणि भविष्यात अशा चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची ग्वाही द्यावी. कारण आज भारताच्या जनतेचा विश्वास या सरकारवर उरलेला नाही. याचा परिणाम केवळ निवडणुकांवर नाही, तर देशाच्या सुरक्षिततेवर होतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!