नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वेच्या तिकिट दरात आजपासून वाढ झाली आहे. परंतू 500 किलो मिटरपर्यंतच्या प्रवासात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. प्रवाशी सेवा जास्त सक्षम करण्यासाठी ही दरवाढ करण्यात आल्याचे प्रसिध्द पत्रक दक्षीण मध्य रेल्वे विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ए.श्रीधर यांनी जारी केले आहे.
रेल्वे विभागाने दिलेल्या प्रसिध्द पत्रकानुसार रेल्वे मंत्रालयाने प्रवासी भाड्यामध्ये 1 जुलै 2025 पासून वाढ करण्यात आली आहे. इंडियन रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशन(आयआरसीए) यांच्या मान्यतेनंतर ही दरवाढ झाली आहे.
उपनगरीय रेल्वे प्रवासी भाड्यात व्यक्तीगत तिकिट आणि मुदतीचे तिकिट या दोन्हीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. द्वितीय श्रेणी सर्वसाधारण बिनावातानुकुलीत प्रवासात अर्धापैसा प्रतिकिलो मिटर अशी वाढ करण्यात आली आहे. त्यात 500 किलो मिटरपर्यंत कोणतीही वाढ नाही. 501 ते 1500 या किलो मिटर दरम्यान रेल्वे प्रवासात प्रतिकिलो मिटर 5 रुपयंाची दरवाढ करण्यात आली आहे. 1501 ते 2500 या किलो मिटरदरम्यान 10 रुपये प्रतिकिलो मिटरची वाढ करण्यात आली आहे. 2501 ते 3000 या किलो मिटरदरम्यान 15 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. साध्या शयन कक्षामध्ये अर्धा पैसे प्रतिकिलो मिटर अशी वाढ करण्यात आली आहे. प्रथम वर्ग शयनकक्षात अर्धा पैसा प्रतिकिलो मिटर वाढ करण्यात आली आहे.
मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये बिना वातानुकुलीत कक्षात द्वितीय श्रेणीत एक पैसा प्रतिकिलो मिटर अशी वाढ झाली आहे आणि शयन कक्षात सुध्दा एक पैसा प्रतिकिलो मिटर वाढ करण्यात आली आहे. हीच दरवाढ प्रतिश्रेणीच्या शयनकक्षात सुध्दा करण्यात आली आहे. वातानुकुलीत कक्षांमध्ये ए.सी.चेअरकार, 3-एकोनॉमी, ए.सी.2-टायर, ए.सी.-1 आणि एक्झीकेटीव्ह क्लास या वर्गांमध्ये 2 पैसे प्रतिकिलो मिटरची दरवाढ करण्यात आली आहे.
रेल्वेच्या विशेष गाड्या राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदे भारत ,तेजस, हमसफर, अमृत भारत, महामना, गतीमान, अंत्योदय, जनशताब्दी, युवा एक्सप्रेस, वातानुकूलीत व्हिस्टा डोमकोच, अनुभूती कोच, सर्वसाधारण बिना उपनगरीय सेवा या सुध्दा त्या–त्या रेल्वेच्या श्रेणीप्रमाणे तिकिट दर बदलणार आहेत.
आजपासून रेल्वेच्या तिकिट दरात वाढ झाली
