नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी इंदिरा गांधी शाळेच्या पाठीमागे सिडको येथे एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून रोख 11 हजार 800 रुपयांसह 3 लाख 18 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात चार जणांना आरोपी करण्यात आले आहे.
पोलीस अंमलदार मारोती शंकरराव पचलिंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 जूनच्या सायंकाळी 6 वाजता त्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार ते आणि त्यांचे पोलीस पथक इंदिरा गांधी शाळेच्या पाठीमागे गेले. तेथे त्यांनी गंगाधर नामदेव चव्हाण, अनिल विश्र्वनाथराव राजगिरवार,शेख मोईन शेख शामदनिय आणि पृथ्वीराज कदम भैय्या सर्व रा.सिडको यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यातील पृथ्वीराज कदम भैय्या हा पळून गेला. त्या ठिकाणी पोलीसांनी 11 हजार 800 रुपये रोख रक्कम तीन दुचाकी गाड्या 2 लाख 50 हजार रुपयांच्या आणि 3 मोबाईल 57 हजार रुपयांचे असा एकूण 3 लाख 18 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुध्द गुन्हा क्रमांक 616/2025 दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार केंद्रे, पवार, कल्याणकर आणि आवळे यांनी ही कार्यवाही केली आहे.
सिडकोच्या जुगार अड्ड्यावर धाड
