नांदेड(प्रतिनिधी)–राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा युवा नेते आनंद (बंटी) लांडगे यांना राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठाण यांच्यावतीने दिला जाणारा राजर्षी शाहू मराठवाडा भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यीक देवीदास फुलारी यांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्यावतीने दि. 29 जून रोजी हॉटेल विसावा येथे मराठवाडास्तरीय भव्य कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात युवा नेते बंटी लांडगे यांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यीक देवीदास फुलारी, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय नांदेड तथा दै. लोकपत्रचे आवृत्ती संपादक डॉ. गणेश जोशी, साहित्यीक महेश मोरे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य राजेश पावडे, संयोजक भैय्यासाहेब गोडबोले यांची उपस्थिती होती.