पत्रकार येणार नाहीत म्हणून शिक्षक परिषदेच्या सदस्यांना बोलावून पत्रकारांचा कार्यक्रम संतोष पांडागळे घडवितात

नांदेड(प्रतिनिधी)-अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे अनेक घटना घडत आहेत. अर्धापूर येथील तालुका पत्रकार संघाने संतोष पांडागळे विरुध्द ते राजकीय पक्षाचे सक्रीय सदस्य आहेत. म्हणून त्यांच्या निवडीविरोधात आपला आक्रोश व्यक्त करतांना संपुर्ण तालुका मराठी पत्रकार संघाच्या 23 सदस्यांनी सामुहिक राजीनामा दिला. पत्रकार संघटनेचे सदस्य वगळता शिक्षक परिषदेचे सदस्य बोलावून पत्रकार संघाचे कार्यक्रम आटोपण्याचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. नांदेड शहरातील पत्रकार त्यांना काही का बोलत नाहीत याचे गमक सुध्दा आता हाती आले आहे. त्यानुसार भारतीय जनता पार्टीच्या जाहीरातींचे वाटप करणे त्यांच्याच हातात आहे. यामुळे पत्रकार थोडा मागे पाय घेतात आणि नेतृत्वा विरुध्द काही बोलत नाहीत. अद्यापही महानगर संघटना जाहीर झालेली नाही. याचे कारण काय? हा ही प्रश्न आज आम्ही पुन्हा उपस्थित करत आहोत.

अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघाने दिलेल्या एका पत्रानुसार मराठी पत्रकार परिषद ही पक्ष नसुन संघटना आहे. या संघटनेचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर संतोष पांडागळे यांनी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी निवडीची माहिती सर्व तालुकाध्यक्ष, सचिव यांना कल्पना पण दिली नाही आणि जिल्ह्यातच बैठक बोलावून आपल्या मनमानी पध्दतीने पदांचे वाटप केले. ज्यामध्ये अनेक पत्रकार असे आहेत की, ते व्हाईसऑफ मिडीया व इतर संघटनांमध्ये काम करतात. अर्धापूर पत्रकार संघाच्या निवेदनाप्रमाणे त्यांनी मराठी पत्रकार परिषदची विचारधारा बाजूला सारुन राजकीय पक्षाप्रमाणे जिल्हा मराठी पत्रकार संघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. म्हणून अर्धापूर मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सय्यद इस्त्याक अली (फिरदोस अली) हुसेनी यांच्यासह या सामुहिक राजीनामा पत्रावर अर्धापूर तालुक्याच्या 23 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
काल परवाच पत्रकार संघाच्यावतीने छायाचित्रकार सचिन मोहिते यांना राज्य शासनाच्यावतीने पुरस्कार मिळाला म्हणून त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात शहरातील मर्जितील पत्रकारांना व्यक्तीगतरित्या संदेश देवून बोलाविण्यात आले होते. सोबतच या कार्यक्रमात गर्दी दिसावी म्हणून शिक्षक परिषदेचे सदस्य असलेले शिक्षक बोलाविण्यात आले होते. याचा अर्थ शिक्षण परिषदेच्या संघटनेवर सुध्दा संतोष पांडागळे यांचा प्रभाव आहे हे स्पष्ट झाले. परंतू पत्रकारांच्या कार्यक्रमात शिक्षकांची उपस्थिती हा एक नवीन पायंडा संतोष पांडागळे यांनी पाडला आहे.
महानगर अध्यक्ष आणि महानगर पदाधिकारी यांची निवड अद्याप झालेली नाही. आजपर्यंत जिल्हाध्यक्ष निवडल्यानंतर तेच त्यांची नियुक्ती करतात. संतोष पांडागळे यांना मराठी पत्रकार संघटना नांदेडचे अध्यक्ष होवून जवळपास सहा महिने होत आले आहेत. परंतू अद्याप महानगर अध्यक्ष आणि महानगर पदाधिकारी यांची निवड करण्यात आलेली नाही. कोणतेही पद या संघटनेत मिळाले तर त्यांना काही मानधन मिळत नाही.
नांदेड शहरात मराठी पत्रकार संघटनेचे 61 सदस्य आहेत. या सदस्यांमधील बहुतांश लोकांना राजकीय पक्षांकडून वितरीत होणाऱ्या जाहीराती हव्याच असतात. भारतीय जनता पार्टीच्यावतीने दिलेल्या जाणाऱ्या जाहिराती वाटण्याचा धंदा संतोष पांडागळे यांच्या हातात आहे म्हणून संघटनेचे सदस्य त्यांना काही बोलत नाहीत. कारण जाहीरातीमधून त्यांचे नाव संतोष पांडागळेंनी कापले तर त्यांच्या वर्तमान पत्रातील प्रशासन त्या पत्रकारांना धारेवर धरेल ही सुध्दा भिती आहे. अशा अत्यंत सक्षम, लढावू, ध्यैर्यशिल, विचारवंत आणि त्यातल्या त्यात इंग्रजीचे शिक्षक अशा सुदृढ व्यक्तीच्या हातात नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे नेतृत्व देण्यात आले आहे. हे पद ज्यांनी कोणी संतोष पांडागळेंना दिले त्यांचे सुध्दा आभार व्यक्त करायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!