नीट (युजी) 2026 प्रवेश परिक्षार्थीची होणार वैद्यकीय तपासणी

नांदेड – नीट (युजी)-2026 प्रवेश परीक्षा काळात प्रतिबंधित वस्तूच्या वापरांवर प्रशासनाचे कडक लक्ष असून, इलेक्ट्रॉनिक, ब्लूटूथ वापर बंदी करण्यासाठी परीक्षार्थींची वैद्यकीय तपासणी होणार आहे. जर परीक्षा केंद्रावर प्रतिबंधीत करण्यात आलेल्या वस्तू परीक्षार्थीकडे आढळून आल्यास तो अनुचित साधनांचा वापर मानला जाईल. नियमानुसार व कायद्यानुसार संबंधित उमेदवाराविरुध्द कारवाई करण्यात येईल. याची नोंद सर्व परीक्षार्थीनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नवी दिल्ली मार्फत आयोजित नीट (युजी)-2026 प्रवेश परीक्षा नांदेड जिल्ह्यात 3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. सदरील परीक्षेकरिता नांदेड जिल्ह्यात एकूण 46 केंद्र असून त्यापैकी नांदेड शहरात 24 परीक्षा केंद्रे तसेच ग्रामीण भागात 22 परीक्षा केंद्र अशी एकूण 46 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत.NEET UG-2026 प्रवेश परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी 3 मे 2026 रोजी परीक्षा केंद्रावर सकाळी ठीक 11 वाजता रिपोर्टींग करावे. स.11 ते 1.30 ही वेळ परिक्षार्थीची तपासणीची वेळ राहील.

परीक्षा केंद्रावर परीक्षा कालावधीत परीक्षार्थी मार्फत कोणत्याही गैर मार्गाचा अवलंब होऊ नये. जसे की, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा, ब्लूटूथचा वापर तसेच मनगटी डिजिटल घडयाळीचा वापर करण्याचे परीक्षार्थी यांनी कटाक्षाने टाळावे तसेच वरील बाबींना आळा घालण्यासाठी परीक्षार्थी यांची परीक्षा केंद्रावर वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत कान, नाक, घसा संबंधाने (ENT) तज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे याची सर्व परीक्षार्थ्‍यांनी नोंद घ्यावी.

उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत नीट (युजी)-2026 प्रवेश परीक्षा केंद्रामध्ये खालील वस्तू घेऊन जाण्याची परवानगी असणार नाही.
उदा. मजकूर साहित्य, मुद्रित किंवा लिखित कागदाचे तुकडे, भूमिती पेन्सिल, बॉक्स, प्लास्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, स्केल, लेखन पॅड, पेन ड्राईव्ह, कॅल्क्युलेटर लॉंग टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन स्कॅनर इत्यादी कोणतीही स्टेशनरी वस्तू उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर आणू नये.

NEET (UG)-2026 प्रवेश परीक्षा केंद्रावर ड्रेस कोड संदर्भाने आयोगाने दिलेल्‍या निर्देशाचे तंतोतंत पालन परीक्षार्थी यांनी करावे. जसे की, वजनाने भारी असलेला पोशाख फुलबाहीचा शर्ट प्रतिबंधित असून सांस्कृतिक व पारंपारिक पोशाखास तपासणी संदर्भाने परीक्षेच्या दिवशी सकाळी 11.30 वा. च्‍या अगोदर परीक्षा केंद्रावरील यंत्रणेकडून तपासणी करून घ्यावी. तसेच परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना परीक्षार्थी यांनी ओळख पटविण्यासाठी आपला पूर्ण चेहरा दोन्ही कानांसह दिसेल याची योग्‍य ती काळजी घ्यावी.

परीक्षार्थी यांनी परीक्षा केंद्रावर इतर वस्तू जसे की वॉलेट, गॉगल, हॅन्डबॅग, बेल्ट, कॅप, कोणतेही मनगटी घड्याळ, ब्रेसलेट, कॅमेरा, कोणतेही दागिने, कोणतेही खादयपदार्थ खुल्‍या स्‍वरुपातील किंवा पॅकेजडं, पाणी बॉटल (पारदर्शक पाणी बॉटल वगळून) इ.कोणत्याही लपवून आणण्याजोग्या वस्‍तू मायक्रोचीप, कॅमेरा, ब्लूटूथ, इ. उपकरण संप्रेषण साधने इतर कोणतीही वस्तू जी अनुचित साधनांसाठी वापरली जाऊ शकते त्या सर्व वस्तू प्रतिबंधित करण्यात आलेल्‍या आहेत त्याची परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!