नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ८७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे कल्लाळ शिवरात २८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. येथे इंजिन बोटींच्या सहाय्याने नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला. या कारवाईत तीन इंजिन बोटी, एक फायबर बोट, ३४ ब्रास वाळू, एक हायवा, एक जेसीबी मशीन असा एकूण ८७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलीस उप निरीक्षक महेश गायकवाड यांच्या तक्रारीवबरून नकुल कुमार सुरेश मंडल,ज्ञानेश्वर व्यंकट लुटे,शिवा तिडके आणि गोविंद सुदाम सावते अश्या चार जणांविरुद्ध गुन्हा क्रमांक ४६७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांसह महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध वाळू व्यवसायावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गोडावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचेही या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू ठेवला आहे. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक पंकज डोंगरे यांच्यासह पोलिस कर्मचारी प्रदीप खानसाळे, संजीव जिकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी आदींचा सहभाग होता. २७ एप्रिल रोजी डीआयजी पथकाने मटका जुगारावर कार्यवाही केली. २८ एप्रिल रोजी मध्य रात्री अवैद्य वाळूवर कार्यवाही केली आहे. खात्रीलायक सूत्रांनी सांगितल्या प्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे एक पथक सुद्धा दररोज रात्री गस्त करत असतात. त्यांच्या सुद्धा सर्व जिल्हा फिरत येतो आणि कोठेही अवैध्य धंदे सुरु असतील तर त्यावर कार्यवाही सुद्धा करता येते. त्यात सगरोळी वाळू घाटाचा सुद्धा समावेश आहे.पण वाळूची कार्यवाही स्थानिक गुन्हा शाखेत नवीन पोलीस निरीक्षक आल्यानंतर सुद्धा डीआयजी पथकाने कार्यवाही केले आहे, वाळूचा आणि त्यांच्या नियुक्तीचा काही संबंध आहे असे आमचे म्हणणे नक्कीच नाही. याशिवाय, १ मेपासून नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देण्यासाठी ‘खबर’ हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून संबंधित माहिती मोबाईल क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित बातमी …. https://vastavnewslive.com/2026/04/29/पोलीस-निरीक्षक-अतुल-भोसल/ https://vastavnewslive.com/2026/04/29/पोलीस-निरीक्षक-अतुल-भोसल/ Kanthak Suryatal Post Views: 1,835 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्रताप गायकवाड हत्या प्रकरण; सहा नव्या आरोपींना अटक ;आठ जणांना २ मे पर्यंत पोलीस कोठडी पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड जिल्हा दौरा