नांदेड दि. 29 एप्रिल :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे 30 एप्रिल व 1 मे 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
गुरुवार 30 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वा. छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. शासकीय विश्राामगृह नांदेड येथून श्री. शंकरराव चव्हाण सभागृह, विष्णुनगर नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. श्री. शंकरराव चव्हाण सभागृह विष्णुनगर नांदेड येथे कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्यास उपस्थिती. सायं. 6.15 वा. श्री. शंकरराव चव्हाण सभागृह विष्णुनगर नांदेड येथून श्रीलक्ष्मी गार्डन मंगल कार्यालय, तरोडा बु. नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. आयु. ॲड मयुर व आयु. ॲड ऐश्वर्या यांच्या मंगल परिणय निमित्त स्वागत समारोहास उपस्थिती. स्थळ- श्रीलक्ष्मी गार्डन मंगल कार्यालय, तरोडा बु नांदेड. सोईनुसार शासकीय विश्रामगृह नांदेड जि. नांदेड येथे आगमन व राखीव.
शुक्रवार 1 मे 2026 रोजी सकाळी 8 वा. शासकीय विश्राामगृह नांदेड येथून वजीराबाद पोलीस मुख्यालय, कवायत मैदान नांदेड येथे आगमन व महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30 वा. खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ- जिल्हा नियोजन भवन सभागृह, नांदेड . सोयीनुसार जिल्हा नियोजन भवन नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील.
