नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड तालुक्यातील मौजे शिखाची वाडी शिवारात एका 33 वर्षीय व्यक्तीचा 4 ते 5 जणांनी खून केल्याची घटना घडली आहे.
शेख सादीक शेख भोले पाशा रा.निजामाबाद, तेलंगणा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.21 जून रोजी दुपारी 12 वाजता 4 ते 5 अनोळखी लोकांनी आणि इतर काही लोक शेख सादीक आणि जोगेंद्रसिंघ टाक यांना तुम्ही भंगार उचलून का नेत आहेत. या कारणासाठी लोखंडी पाईपने भरपूर मारहान केली. त्यात जोगेंद्रसिंग जगविंदरसिंग टाक (33) रा.रमामाता आंबेडकरनगर हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ नेले असतांना तो मरण पावला. मुदखेड पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 114/2025 नुसार दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक बी.आर.कांबळे अधिक तपास करीत आहेत.
भंगार उचलून नेणाऱ्याचा खून
