नांदेड(प्रतिनिधी)-एका पिडीत युवतीचे दोषारोपपत्र 18 तासात न्यायालयात सादर करून नांदेड ग्रामीण पोलीसांनी एक आदर्श उभारला आहे.
पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या हद्दीत राहणाऱ्या एका युवतीने 24 जून 2025 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार ती विद्यापीठ परिसरात राहते. तिला देऊळगाव ता. पालम जि.परभणी ह.मु.नांदेड येथील सतिश बळीराम दुधाटे हा युवक त्रास देत होता. या संदर्भाची तक्रार आल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 604/2025 दाखल केला. या संदर्भाचा तपास पोलीस अंमलदार हरीष मांजरमकर यांच्याकडे देण्यात आला. हरीष मांजरमकर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून अत्यंत त्वरीत कार्यवाही करत, जाब जबाब नोंदवून आरोपी सतिश बळीराम दुधाटे यास अटक केली आणि त्याच्याविरुध्द 18 तासात न्यायालयात दोषारोप पत्र क्रमंाक 233/2025 दाखल केला. या कामात पोलीस अंमलदार साहेबराव हौसरे यांनी मांजरमकर यांना मदत केली. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आणि नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी आपल्या पोलीस अंमलदारांचे या कामगिरीसाठी कौतुक केले आहे.
युवतीला त्रास देणाऱ्या युवकाविरुध्द 18 तासात दोषारोपपत्र दाखल; नांदेड ग्रामीण पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी
