मोकली ता.धर्माबाद येथील कुटूंबाला देवदर्शन महागात पडले

नांदेड(प्रतिनिधी)- मौजे मोकली ता.धर्माबाद येथे एका कुटूंबियांना देवदर्शन अत्यंत महागात पडले आहे. चोरट्यांनी त्यांचे घर फोडून त्यातून 1 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
शेषराव विठ्ठलराव वारले (63) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 जूनच्या मध्यरात्रीनंतर 2 वाजेपासून ते 23 जूनच्या पहाटे 5 वाजेदरम्यान त्यांनी आपले घर बंद करून त्याला कुलूप लावून देवदर्शनासाठी गेले होते. परंतू परत आल्यानंतर पाहिले असता त्यांच्या घरातून रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिणे असा एकूण 1 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेला होता. या संदर्भाने कुंडलवाडी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 115/2025 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!