*नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड,किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट आयोजक* नांदेड- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 08 फेब्रुवारी, 2025 रोजी तालुका क्रिडा संकुल, किनवट जिल्हा नांदेड येथे शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर आयोजीत करण्यात आले आहे. समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तीला योग्य तो न्याय मिळण्याच्या उद्येशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणा-या योजना व मोफत विधी सेवा, त्याचप्रमाणे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा तसेच समाजातील अगदी तळागाळातील व्यक्ती सुध्दा या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती होण्यासाठी या महाशिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. तालुका क्रिडा संकुल किनवट या ठिकाणी दिनांक 08 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11ः00 वाजता या महाशिबिराचे उदघाटन समारंभ होत असून महाशिबीरामध्ये विविध शासकीय सेवा व योजनांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांनी या महाशिबीराचा मोठ्या संख्येत उपस्थित राहून जास्तीत जास्त लाभ घ्यावा ,असे आवाहन मा. सुरेखा कोसमकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड, अभिजीत राउत, जिल्हाधिकारी, नांदेड, श्रीमती दलजीत कौर जज, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 534 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड पोलीस परिक्षेत्रात पाच पोलीस निरीक्षक आणि ११ सहायक पोलीस निरीक्षकांना नविन नियुक्त्या जिल्हा आरोग्य अधिकारी गेल्या साखर कारखानाच्या पाला वर