नांदेड जिल्ह्यात पोलीस हवे 7005 पण आहेत फक्त 3800

नांदेड जिल्ह्यात पोलीसांची संख्या अपुरी; वाढत्या लोकसंख्येमुळे ताण वाढला

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्याची वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार पोलीस दलातील अपुरी मनुष्यबळ संख्या हा गंभीर प्रश्न बनला आहे. उपलब्ध माहितीनुसार, 2001 मध्ये नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या 28 लाख 76 हजार 259 इतकी होती. 2011 मध्ये ती वाढून 33 लाख 61 हजार 292 वर पोहोचली. म्हणजेच दशकभरात सुमारे 4 लाख 85 हजारांची वाढ झाली आहे. 2026 पर्यंत जिल्ह्याची लोकसंख्या 40 लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सध्या नांदेड जिल्ह्यात अंदाजे 38 पोलीस ठाणे कार्यरत आहेत. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस दलाची संख्या अत्यल्प असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात सरासरी 571 लोकसंख्येमागे एक पोलीस कर्मचारी आहे. तर नांदेड जिल्ह्यात हे प्रमाण तब्बल 1052 लोकसंख्येमागे एक पोलीस कर्मचारी इतके आहे.

2011 च्या लोकसंख्येनुसार 571 लोकसंख्येमागे एक पोलीस कर्मचारी या प्रमाणात जिल्ह्यासाठी सुमारे 5886 पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. तर 2026 च्या अंदाजित 40 लाख लोकसंख्येनुसार ही गरज सुमारे 7005 पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या वाढत्या आव्हानांमुळे नांदेड जिल्ह्यात पोलीस दलाची संख्या वाढविण्याची मागणी जोर धरत आहे. स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांकडून नवीन पोलीस भरती तसेच अतिरिक्त पोलीस ठाण्यांची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

सन 2017 नंतर महाराष्ट्र सरकारने नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अमंलदारांची संख्याच वाढवली नाही. म्हणूनच नांदेड जिल्ह्यात पोलीस अधिकारी मी काय करू माणसेच कमी आहेत असे सांगत असतात आणि पोलीस अंमलदार सुद्धा कार्य करावे साहेब डबल ड्युटी लावतोय काय करावे असे बोल्ट असतात. पण काही ठिकाणी मंजूर संख्ये पेक्षा जास्त आहेत त्याचे काय? कारण त्या जागा मोदकांच्या आणण्यासाठीच्या मार्गांना उघड करतात. असो पण अखेर नांदेड जिल्हा पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता आहेच ने मात्र त्रिवार सत्यच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!