नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी कविता रेस्टॉरंट बाफना या इमारतीच्या गच्चीवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 12 जणांविरुध्द जुगार कायद्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार इतवारा व पोलीस ठाण्याचे पथक सुध्दा या कार्यवाहीत सहभागी झाले होते.
वजिराबाद येथील पोलीस अंमलदार ज्ञानेश्र्वर गव्हाणकर याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीअनुसार त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यातील बरेच पोलीस अंमलदार, पोलीस अधिकारी, तसेच इतवारा पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकारी यांनी संयुक्तरित्या कविता हॉटेल बाफना ज्या इमारतीत आहे. त्या गच्चीवर चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. हा घटनाक्रम 23 जूनच्या मध्यरात्रीनंतर 12.30 वाजता घडला आहे.
या ठिकाणी पोलीसांनी सचिन माधवराव माकणे (24) रा.आनंदनगर नांदेड, शिवम संजु वानखेडे(25) रा.नवीन मोंढा नांदेड, हरप्रितसिंघ कश्मिरसिंघ मल्ली रा.नंदीग्राम सोसायटी, सचिन रामदास कळणे (36), रा.विनायकनगर, अक्षय विजय भराडीया(28) रा.सिडको, सचिन भागवतराव आहेर (31) रा.चौफाळा, सावंतसिंह सोनुसिंह परमार (29)रा.वजिराबाद नांदेड, सौरभ साहेबराव चौदंते(24)रा.तानाजीनगर नांदेड, राजेश शंकरराव सौराते रा.आलेगाव ता.पुर्णा जि.परभणी, दिनेश भगवान भद्रे(25) रा.नवीन मोंढा नांदेड, अजय किशन राठोड(30) रा.कलामंदिर नांदेड, पवितसिंघ आरतीया रा.दशमेशनगर नांदेड या 12 जणांना पकडले. किंबहुना यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. त्या ठिकाणावरून पोलीसांनी 82 हजार 230 रुपये रोख रक्कम आणि 3 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 9 मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकणातील एक पवितसिंघ आरतीया यांना पकडण्यात आलेले नाही. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम 4, 7 नुसार गुन्हा क्रमांक 71/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार माधव नागरगोजे हे करीत आहेत.
पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम, सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे, पोलीस अंमलदार माधव नागरगोजे, हबीब चाऊस, ज्ञानेश्र्वर पांचाळ, संतोष आलुरवाड, ज्वालासिंग बावरी, अर्जुन मुंडे, श्रीराम दासरे यांचे या कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे.
वजिराबाद पोलीसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारला; 82 हजार रुपये रोख रक्कम जप्त , 12 जणांविरुध्द गुन्हा दाखल
