नांदेड(प्रतिनिधी)-तामसा येथे घराला कुलूप लावून भावाला शासकीय रुग्णालय नांदेड येथे घेवून गेल्याची संधी चोरट्यांनी साधली आणि ते घर फोडून त्यातून 1 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
तामसा येथील हॉटेल व्यवसायीक सोमनाथ बालाजी नारेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 जूनच्या सकाळी 11 वाजता त्यांनी तामसा येेथील आपले घर बंद केले, कुलूप लावले आणि आपल्या भावाला शासकीय रुग्णालय नांदेड येथे उपचारासाठी भरती करण्यास आले. 19 जून रोजी सकाळी 8 वाजता ते परत तामसा येथे आले असतांना त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले होते. चोरट्यांनी घरातून लोखंडी कपाटात ठेवलेले 50 हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा 1 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तामसा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 112/2025 प्रमाणे दाखल केली असून तपास पोलीस उपनिरिक्षक नरवटे यांच्याकडे देण्यात आला आहे.
तामसा येथे 1 लाख 55 हजारांची घरफोडी
