नांदेड – मुदखेड येथील 33 वर्षे युवकाचा चार जणांनी मिळून मोटरसायकल फोडल्याच्या कारणावरून खून केल्याची घटना मुदखेड शहरात घडली आहे.
प्रवीण सोनाजी पाचपुंजे (48) रा. मुदखेड यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नाकर श्यामराव तारू, रजनिकांत श्यामराव तारू, अनिल श्यामराव तारू, चंद्रमणी उर्फ सोन्या मारोती कांबळे, सर्व रा. मुदखेड, ता.मुदखेड जि. नांदेड यांनी संगणमत करून मयत सुमेध सोनाजी पाचपुजे( 33) रा. अशोक नगर मुदखेड या युवकाचा मोटार सायकल फोडण्याच्या कारणावरून लाथाबुक्याने व काठीने डोक्यात मारहाण करून गंभीर दुखापत करून खुन केला आहे. मुदखेड पोलिसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 107/2025 कलम 103 (1), 115 (2) 3 (5), भारतीय न्याय संहिता-2023 कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन अधिक तपास पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण हे करीत आहेत. या गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.