नांदेड(प्रतिनिधी)-निवेदन देवून रस्त्याच्या मजबुतीकरणाची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते बिरबल बिरजू यादव यांनी सात दिवसात काम सुरू झाले नाही तर रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
बिरबल यादव यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार एक्ससीस बॅंक शिवाजीनगर उड्डाणपुल, दिपक लॉज ते मिलगेट या रस्त्याची अवस्था अत्यंत दैयनिय झाली आहे. हा रस्ता मुख्य बसस्थानकाजवळ आहे. तसेच नाळेश्र्वर, वाघी, सुगाव, हस्सापूर, खडकपुरा, नल्लागुट्टा चाळ या भागाकडे जाणाऱ्या-येणाऱ्या नागरीकांची मोठी संख्या या दैयनिय रस्त्यामुळे रस्त्याच्या दैयनिय रस्त्यापेक्षा जास्त दैयनिय झाली आहे. मागील 17 वर्षापासून या रस्त्याची दुरुस्तीपण झाली नाही किंवा नवीन डांबरीकरण सुध्दा झालेले नाही. परिसरातील नागरीकांना या रस्त्यावरून जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो आहे. या रस्त्यावर असलेल्या मोठ मोठ्या खड्यांमुळे अपघात होत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे या रस्त्यावर असलेल्या सर्व प्रतिष्ठाणांवर धुळ साचली आहे. या अगोदर सुध्दा 12 एप्रिल 2022 आणि 16 नोव्हेंबर 2024 रोजी या रस्त्याच्या कामासंदर्भाने निवेदन दिले होते. परंतू अद्याप या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. सात दिवसात या रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर आम्ही रास्ता रोको करु असे निवेदनात लिहिले आहे.
रस्त्याचे काम करा नाही तर रस्ता रोको-बिरबल यादव
