नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी मेंढला(बु) शिवारातील एका नाल्यात चोरीने अवैध रेती भरलेला ट्रक्टर पकडला आहे. ही धडाकेबाज कार्यवाही पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.
स्वत: पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार दि.16 जून रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास मेंढला (बु) शिवारातील लक्ष्मण येंडरगे यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यात बेकायदेशीर रित्या वाळू चोेरली जात आहे. चंद्रशेखर कदम यांनी आपले सहकारी पोलीस अंमलदार गजानन भालेराव, पप्पु चव्हाण, सलीम शाह, अखिल बेग यांच्यासह मेंढला शिवार गाठले. तेथे ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.26 बी.सी.3619 आणि त्याला जोडलेली बिना नंबरची ट्रॉली पकडली. त्यात चोरलेली एक ब्रास वाळू भरलेली होती. पोलीसांनी ट्रॅक्टर आणि वाळू असा 5 लाख 5 हजारांचा मुद्देमाल या प्रकरणात जप्त केला आहे. या ट्रक्टरचा चालक तुळशीराम नवनाथ भरकड (25) आणि ट्रक्टर मालक दत्ता तुळशीराम भरकड (38) दोघे रा.मेंढला (बु) या दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 363/2025 दाखल केला आहे. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी अर्धापूर पोलीसांचे कौतुक केले आहे.
अर्धापूर पोलीसांची रेती विरुध्द धडाकेबाज कार्यवाही
