नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी काल रात्री दोन ठिकाणी एकूण 11 गोवंश जातीची जनावरे पकडली आहेत. या गोवंशांची एकूण किंमत 3 लाख 70 हजार रुपये आहे. दि.2 जुनच्या रात्री पोलीस ठाणे इतवारा येथील पोलीस निरिक्षक रणजित भोईटे आणि गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी गस्त करत असतांना रेल्वे गोडाऊनच्या पाठीमागे इसलामपुरामध्ये गोवंश जनावरे असल्याची माहिती मिळाली तेंव्हा त्यांनी तेथे छापा टाकला. त्या ठिकाणावरुन एकूण 11 गोवंश जनावरे जप्त करण्यात आली. त्यांची एकूण किंमत 3 लाख 70 हजार रुपये आहे. ही कार्यवाही पोलीस निरिक्षक रणजित भोईटे, सहाय्यक पोलीस निरिक्षक चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार मोहन हाके, शेख वाजीद, धिरज कोमुलवार, लक्ष्मण दासरवाड, नजरेआजम देशमुख, इजरायल, अर्जुन मुंडे, श्रीराम दासरे, शेख वाजीद यांनी केली. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी इतवारा पोलीसांचे कौतुक केले आहे. पोलीस अंमलदार धिरजकुमार कोमुलवार आणि मोहन हाके यांनी दोन स्वतंत्र तक्रारी दिल्यानंतर गुन्हा क्रमांक 184, 185/2025 दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणांमध्ये शेख रहिम शेख खाजा रा.इस्लामपुरा आणि मोहम्मद जाकेर मोहम्मद फारुख रा.साईनगर इतवारा या दोघांची नावे आरोपी सदरात आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,029 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 50 लाखांचा हायवा चोरीच्या वाळूसह नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडला मोगल काळाबद्दल जगाला माहित असलेली परिस्थिती चुकीची आहे-जावेद अख्तर