भोकर – पुण्यश्लोक, राजमाता, लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज 300 वी जयंती त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्ष म्हणून साजरी करण्यात येत आहे. डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शना खाली ग्रामीण रुग्णालय भोकर येथे ” अहिल्यादेवी होळकर ” यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ मायादेवी नरवाडे दंत शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर रेड्डी, डॉ.कारत्या रेड्डी मॅडम, डॉ. विजया किनीकर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, मनोज पांचाळ, सहाय्यक अधिक्षक संजय देशमुख,इंचार्ज सिस्टर श्रीमती राजश्री ब्राम्हणे, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, संदीप ठाकूर, मल्हार मोरे, गिरी रावलोड, एनसीडी समुपदेशक भालेराव, रेणुका भिसे, आरकेएसके समुपदेशक सुरेश डुम्मलवाड, योगेश योगी, आरोग्य मित्र सुधाकर गंगातिरे, दिनेश लोट, गंगाधर शिंदे, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 1,074 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लाच सापळ्याची चाहूल लागतात पोलीस उपनिरीक्षक फरार पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी 10 पोलीस निरिक्षक, 28 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 37 पोलीस उपनिरिक्षकांना परिक्षेत्रात दिल्या बदल्या; काहींना एक वर्षाची मुदतवाढ