सहा महिन्यानंतर भारताचे सरन्यायाधीश होणाऱ्या न्यायमुर्ती सुर्यकांत बद्दल एक पत्र आता व्हायरल झाले

ठ वर्षापुर्वीची एक चिठ्ठी किंबहुना पत्र जे पत्र भारताच्या सरन्यायाधीशांना लिहिलेले होते. त्यात सहा महिन्यानंतर भारताचे सरन्यायाधीश होणाऱ्या न्यायमुर्ती सुर्यकांत यांच्या विषयी अनेक आक्षेप लिहिले होते. ते पत्र व्हायरल झाल्यामुळे न्यायमुर्ती सुर्यकांत जेंव्हा भारताचे सरन्यायाधीश होतील. त्या सहा महिन्यानंतरच्या काळाची भिती आताच वाटायला लागली आहे. हे व्हायरल झालेले पत्र कोणी साध्या माणसाने लिहिले नाही. ते सुध्दा न्यायमुर्तींनी सरन्यायाधीशांना लिहिलेले आहे.


दि.12 जानेवारी 2018 रोजी तत्कालीन सर्वोच्च न्यायालयातील न्यायमुर्ती आदर्श गोयल यांनी त्यावेळच्या सरन्यायमुर्तींना लिहिले होते. त्याचा संदर्भ असा होता की, पंजाब व हरीयाना येथील उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती सुर्यकांत यांना मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय हिमाचल प्रदेश या पदावर नियुक्तीच्या संदर्भाने आहे. कोलेजीएमने न्यायमुर्ती ए.के.मित्तल यांची निवड हिमायचल प्रदेशच्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदी केली होती. न्यायमुर्ती मित्तल न्यायमुर्ती सुर्यकांतपेक्षा वरिष्ठ होते. तरी पण नियुक्ती सुर्यकांत यांचीच झाली. न्यायमुर्ती आदर्श गोयल यांनी लिहिलेल्या पत्राप्रमाणे न्यायमुर्ती सुर्यकांत यांची चौकशी, त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि आपल्या निकालात जातीविषयक टिपणी केल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. म्हणून ते नक्कीच हिमाचल प्रदेश राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती होण्यास पात्र नाहीत. न्यायमुर्ती गोयल यांच्या पत्राप्रमाणे न्यायमुर्ती सुर्यकांत यांची चौकशी होणे आवश्यक होते. परंतू ती झालीच नाही. पुढच्या सहा महिन्यानंतर अर्थात सध्याचे भारताचे सरन्यायाधीश न्यायमुर्ती भूषण गवई यांच्या सेवानिवृत्तीनंतर न्यायमुर्ती सुर्यकांत हेच भारताचे सरन्यायाधीश होणार आहेत आणि सन 2027 पर्यंत ते त्या पदावर राहणार आहेत. कारण सध्याच्या परिस्थितीत वरिष्ठ तेच आहेत. पण आम्ही वाचकांसमोर हा मुद्दा मांडत आहोत की, विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांच्या संदर्भाने वि.दा.सावकर यांच्या बाबतीतला निकाल आला तेंव्हा न्यायामुर्ती सुर्यकांत यांनी खा.राहुल गांधी यांना सांगितले होते की, अशा मोठ्या लोकांविरुध्द बोलणे बंद करा. तुम्ही ईतिहासावर कसा पडदा टाकता असा प्रश्न विचारला होता. सावरकरांनी देशासाठी जे काही केले. त्यांच्या ठिकाणी ते बरोबरच आहेत. तसेच सावरकरांनी माफी मागितली, ते इंग्रजांच्या पेन्शनवर होते हा अभिलेख उपलब्ध आहे. 1947 मध्ये सरदार वलभभाई पटेल भारतातील सर्व संस्थांनाना भारतात विलीन करून घेण्यासाठी झटत असतांना वि.दा.सावरकरांनी सर्व संस्थांनाना पत्र लिहुन भारतात सामील न होण्यासाठी सांगत होते. ही वस्तुस्थिती आहे. ते पत्र उपलब्ध आहेत. हा ईतिहास कसा नाकारता येईल. खा.राहुल गांधींच्या संदर्भाने निकाल देतांना न्यायमुर्ती सुर्यकांत यांनी हे पाहायला हवे होते की, खा.राहुल गांधींनी सांगितले सावरकरांनी माफी मागितली. ती त्यांनी मागितली की नाही याची तपासणी करायची होती. पण तो निकाल देतांना न्यायमुर्ती सुर्यकांत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचाही उल्लेख त्या निकालात केला. गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी गेले असतांना त्यांनी सर्वांना हात जोडले होते. हा भारतीय संस्कृतीतला शिष्टाचार आहे. समर्पण नव्हे. वि.दा.सावरकरांनी इंग्रज मायबाप आहेत. मी इंग्रजांची माफी मागायला तयार आहे, मी इंग्रजांची सेवा करायला तयार आहे. मला पेन्शन मिळाली पाहिजे. हे पत्र अभिलेखावर उपलब्ध आहेत. पण न्यायमुर्ती सुर्यकांत यांनी महात्मा गांधी यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात आपल्या स्वाक्षरीच्या खाली आपला अज्ञाधारक असे शब्द लिहिले त्या शब्दांसोबत वि.दा.सावरकरांनी लिहिलेल्या पत्राची तुलना करता येत नाही याचा विसर पडला. त्यांनी ईतिहासावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. खरे तर न्यायाधीशांनी फक्त सत्यता तपासायची आहे.


आपल्या ताटात माशी पडली तर आपल्या तोंडात घास उतरणार नाही. समोर सत्य दिसत असतांना निकाल वेगळाच आला तर ज्या भारतीय जनतेचा न्याय संस्थेवर प्रगाढ विश्र्वास आहे. तो जनतेचा विश्र्वास तुटेल आणि अनेक प्रश्न उभे राहतील. कारण न्यायपालिकेवर प्रश्न उभे राहिले तर संविधानाला धोका तयार होईल. कारण न्यायव्यवस्थाच संविधानाची अभिरक्षक आहे. ते पत्र पाहिले तर सहज वाटते की, न्यायमुर्ती आदर्श गोयल यांनी न्यायमुर्ती सुर्यकांत यांच्यावर चौकशी का झाली नाही?का न्यायमुर्ती मित्तल यांची वरिष्ठता डावलून न्यायमुर्ती सुर्यकांत यांना हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावर बसविण्यात आले. न्यायमुर्ती हे आमच्यासाठी मायबाप आहेतच. पण ते करदात्याच्या पैशावरच आपला खर्च भागवतात. संविधानाचे अभिरक्षक असलेले न्यायमुर्ती मोठ्या बंगल्यातच राहावे. आम्हाला काही आक्षेप नाही. पण देशाच्या प्रत्येक नागरीकाची, करदात्याची अपेक्षा पुर्ण करणे ही जबाबदारी सुध्दा न्यायमुर्तींचीच आहे. म्हूणनच सहा महिन्यानंतर भारताचे सरन्यायाधीश होणाऱ्या न्यायमुर्ती सुर्यकांत बद्दल भारतीय जनतेच्या मनात आजपासूनच भिती वाटायला सुरू झाली. आम्ही लिहिलेल्या विवेचनावर वाचकांनी प्रतिक्रिया द्याव्यात अशी अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!