नांदेड(प्रतिनिधी)-शासन निर्णयाचे उल्लंघन करून आपल्या पदाचा दुरूपयोग करून शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील तीन जणांनी आणि इतर सात जणांनी संगणमत करून शासनाची 4 कोटी 4 लाख 5 हजार 896 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नांदेडच्या शिवाजीनगर पोलीसांनी दाखल केला आहे.
पुण्यात राहणारे अभिजित भागवत खेडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2022 ते 2024 दरम्यान शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य नागेश एल. जानराव, सहसंचालक नाशिक विभागाचे गोरक्षक व्ही. गर्जे आणि शासकीय तंत्रनिकेत नांदेड येथील प्रकाश डी.पोफळे यांनी इतर सात आरोपीमार्फत संगणमत करून शासनाच्या महसुल उत्पन्नावर आधिपत्य व नियंत्रण असणारे लोकसेवक असतांना शासन निर्णयाचे जाणून बुजून उल्लंघन करून आपल्यासाठी व इतर आरोपींसाठी बेकायदा गैरलाभ घेवून शासनाची 4 कोटी 4 लाख 5 हजार 896 रुपयांची फसवणूक केली आहे. नांदेड येथील शिवाजीनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 409, 34 प्रमाणे गुन्हा क्रमांक 196/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे हे करीत आहेत.
शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यासह 12 जणांविरुध्द 4 कोटीच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल
