नांदेड (प्रतिनिधी)- चोरटी विक्री करण्यासाठी जमा केलेला 20 ब्रास वाळूचा साठा नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडला आहे. या वाळू साठ्याची किंमत 90 हजार रूपये आहे. पोलीस अंमलदार रामकिशन पांडूरंग मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता गंगानगर वाजेगाव येथील महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत त्यांना एक वाळूसाठा दिसला. त्याची चौकशी केली असता हा वाळूसाठा शेख इलियास उर्फ इलू रा. गंगानगर याने केलेला होता. या वाळू साठ्याची किंमत 90 हजार रूपये आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र. 335/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,069 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मारहाण करणाऱ्या 11 हजार रूपये रोख दंडाची शिक्षा पिंपराळा शिवारातून दोन गायी गेल्या चोरीला