ट्रक विहिरीत कोसळून सहा मजुरांचा मृत्यू

नांदेड,(प्रतिनिधी)-शसरापासून जवळच असलेल्या आलेगाव जवळ एका ट्रॅक्टर मधून शेतमजूर कामाला जात असताना तो ट्रॅक्टर विहिरीत कोसळला त्यात सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

आज सकाळी नांदेड शहरापासून लगत असलेल्या आलेगाव जवळ एक ट्रॅक्टर मध्ये काही शेतमजूर प्रवास करत असताना तो ट्रॅक्टर अचानकपणे एका विहिरीत कोसळला आहे. विहिरीत पडलेला ट्रॅक्टर मधील सहा जणांचा मृत्यू मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणात काही कामगार जखमी सुद्धा आहेत पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक अपघातातील जखमींना मदत करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!