नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील पारसनगर भागातील बालाजी मंदिराजवळ दोन भावांनी मिळून एका 25 वर्षीय व्यक्तीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गणेश शिवभक्ते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.16 फेबु्रवारी रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेदरम्यान पारसनगर येथील बालाजी मंदिराजवळ त्यांना राहुल बाबुराव सुर्यवंशी (36) आणि राजकुमार बाबुराव सुर्यवंशी (39) दोघे रा.लालवाडी हे भेटले आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून राहुल शिवभक्तेच्या छातीवर, डाव्या बगलेत, गळ्याजवळ खंजीरने सपासप सार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. शिवाजीनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 60/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक किशोर गावंडे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,676 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नरेंद्र मोदी यांनी मुख्य निवडणुक आयुक्त पदासाठी राजीवकुमारचा पर्याय ज्ञानेशकुमारमध्ये शोधला वजिराबाद पोलीसांनी 20 किलो गांजा पकडला ; महिला आणि पुरूषाला 23 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी