नांदेड (प्रतिनिधी)-दि. 7 फेब्रुवारी रोजी माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या 127 व्या जन्मोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे अशी माहिती आयोजक मंगेश खंडागळे यांनी दिली. माता रमाई आंबेडकर यांचा 127 वा जन्मोत्सव सोहळा निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी उपस्थितांना भारतीय संविधान प्रस्ताविका प्रतींचे वाटप करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भदंत पय्याबोधीजी थेरो यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिवन आधार या ब्लड बँकेने रक्त संकलनाचे काम केले. यावेळी बापूराव गजभारे, गणेश शिंगे, सुभाष काटकांबळे, रमेश चित्ते, प्रकाश रोकडे, सत्यपाल सावंत,सुखदेव चिखलीकर,विकी वाघमारे, कैलाश माने, साहेबराव सोनकांबळे, राहुल चिखलीकर, अविनाश गायकवाड, राहुल घोडजकर यांची प्रमुख उपस्थिती होती. Kanthak Suryatal Post Views: 1,153 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुंबई उच्च न्यायालयात निवडणुका रद्द करण्यासाठी याचिका दाखल; ऍड.प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू ऑलिंपियाड परिक्षेत्र तेजसी बाचेला गोल्डमेडल