नांदेड(प्रतिनिधी)-माता रमाई आंबेडकर यांच्या 127 व्या जन्मोत्सवानिमित्त त्रिपिठक बौध्द विहार येथील मैदानात होममिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रता विजेत्यांना बक्षीसे दिली जाणार आहेत. माता रमाई आंबेडकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त भैयासाहेब आंबेडकरनगर देगावचाळ येथे होममिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन येथे होणार आहे. या कार्यक्रमात महिला विजेत्यांना बक्षीसे दिली जाणार आहेत. प्रथम पारितोशिकात सोन्याची नथ, पैठणी साडी आणि सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी चांदीचे नाणे पैठणी साडी आणि सन्मान चिन्ह तसेच तृतीय क्रमांकासाठी पैठणी साडी आणि सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन युवराज शिंदे व श्रध्दा शिंदे हे करणार आहेत. या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष श्रीमती कमलताई लांडगे, सौ.वृषाली आनंद उर्फ बंटी लांडगे या आहेत. कार्यक्रमाचे आयोजक त्रिपिठक बौध्द विहार समितीचे अध्यक्ष आनंद उर्फ बंटी लांडगे यांनी आवाहन केले आहे की,जास्तीत जास्त महिलांनी या निशुल्क असलेल्या होममिनिस्टर या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा. कार्यक्रम रविवार दि.9 फेबु्रवारी 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सुरू होईल. Kanthak Suryatal Post Views: 1,302 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड शिष्टाचाराचा फज्जा उडवून उपमुख्यमंत्र्यांच्या जवळ भाजप, मोदी, शाह निवडणुकीत न हरण्याचे रहस्य त्यांनी स्वत:च उघडले