नांदेड(प्रतिनिधी)-वेअर हाऊसमध्ये ठेवलेली तुर परस्पर विक्री करून वेअर हाऊसच्या मालकाने अनेक शेतकऱ्यांना 14 लाख 63 हजार 775 रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार घडला आहे.
मुक्रामाबाद ता.मुखेड येथे पंदीलवार ऍग्रो वेअर हाऊस आहे. दि.28 जानेवारी 2021 ते 25 सप्टेंबर 2023 दरम्यान मनोज मधुकरराव पंदीलवार या आडत व्यापाऱ्याने 340 क्विंटल 53 किलो एवढी लाल तुरी या वेअर हाऊसमध्ये ठेवली. रविंद्र पंदीलवार यांनी पंदीलवार ऍग्रो वेअर हाऊसकडून 19 लाख रुपये उचल घेतली होती. व्याजासह ती रक्कम 26 लाख 36 हजार 225 रुपये झाली. पण उर्वरीत त्यांची लाल तुरी पंदीलवार ऍग्रॉ वेअर हाऊसचे मालक रविंद्र उत्तम पंदीलवार यांनी त्यांची परवानगी न घेता परस्पर विक्री केली. मनोज पंदीलवार यांची व इतर शेतकऱ्यांची पण तुर विकली. रविंद्र पंदीलवार यांनी एकूण 14 लाख 63 हजार 775 रुपयांचा चुना लावून विश्र्वासघात आणि फसवणूक केली आहे. मुक्रामाबाद पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406 नुसार पंदीवार वेअर हाऊचे मालक रविंद्र उत्तम पंदीलवार विरुध्द गुन्हा क्रमांक 19/2025 केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक केंद्रे यांच्याकडे देण्यात आला आहे.
वेअरहाऊसमध्ये ठेवलेले 14 लाख 63 हजार 775 रुपयांची तुर परस्पर विकली
