कुंभमेळ्याबाबत अनेक घटना घडल्या असतांना उत्तर प्रदेश सरकार सर्व काही लपविण्याच्या तयारीत आहे. पण असे म्हणतात सत्यकधी लपत नसते. एका जिगरबाज पत्रकाराने स्टिंग ऑपरेशन करून काढलेल्या माहितीनुसार त्याने रेकॉर्डींग केलेल्या नोंदवहीमध्ये 267/2025 हा आकडा पाहिला आहे. पण हा आकडा मृत्यूचा की, बेपत्ता झालेल्यांचा याची पुष्ठी झाली नाही. पण दिसणाऱ्या नोंदवहीमध्ये एका पानावर तिन-तिन फोटो लावलेले दिसतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सुध्दा त्रिवेणी संगमावर डुबकी घेण्यासाठी जाणार आहेत.
प्र्रयागराजमध्ये उपस्थितीत त्रासलेले भाविक आणि प्रयागराजचे नागरीक असे सांगत आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची डुबकी आस्था आणि श्रध्देची नसून राजकीय आहे.
29 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेनंतर आज एक आठवडा उलटा आहे. हजारो भाविक आजही आपल्या नातलगांना त्या ठिकाणी शोधत आहेत. एक भाविक आपल्या आईबद्दल सांगतांना रडत सांगत होता की, आम्ही या ठिकाणी आठ दिवसा झाले आईला शोधत आहोत पण कोणीच प्रतिसाद देत नाहीत. अखेर स्वरुप राणी दवाखान्यात आम्ही आमच्या आईचे प्रेत ओळखले. तेंव्हा तेथील प्रशासनातील लोक सांगतात की, गुपचूप प्रेेत घेवून जा. भाविक कायदेशीर कार्यवाहीची मागणी करत असतांना त्याला पोलीसांनी मारहाण केली आहे, त्याचा मोबाईल घेवून टाकला आहे असा आरोप भाविक करतो. अखेर त्याच्याकडून एका कोऱ्या कागदावर सही घेण्यात आली आणि त्यावर उत्तर प्रदेश प्रशासनातील लोकांनी असे लिहुन घेतले की, आम्हाला शवविच्छेदन करायचे नाही. अशा पध्दतीचा कारभार त्या ठिकाणी सुरू आहे. आम्ही फक्त पाणी पिऊन आईचे प्रेत मागील सात दिवसांपासून शोधत आहोत हे ऐकून अंगावर काटा येत होता. हा प्रकार फक्त स्वरुप राणी हॉस्पीटलमध्येच नसून मोतीलाल नेहरु कॉलेजमध्ये सुध्दा आहे.
4 पीएमचे जिगरबाज पत्रकार क्षितिजकांत आपल्या एका साथीदाराला घेवून स्वरुप राणी दवाखान्याच्या शवागारात गेले. क्षितिजकांत सांगतात साथीदाराचे नाव मला सांगायचे नाही कारण तो स्थानिक व्यक्ती आहे आणि त्याची पण इच्छा अशी आहे की, माझे नाव प्रसिध्द करू नका. कारण मागील काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेश सरकारने काही पत्रकारांवर गुन्हे दाखल केले आहेत आणि पत्रकारीतेचा कायदा बदलण्याची प्रक्रिया लोकसभेत प्रलंबित आहे. क्षितिजकांत आणि त्याचे सहकारी स्वरुप राणी दवाखान्यात जातांना एक हरवल्याची नोंद सोबत घेवून गेले आणि सांगत होते की, हा हरवलेला व्यक्ती आमचा नातलग आहे. आम्हाला प्रेत दाखवू नका परंतू नोंदवही दाखवा. त्यानंतर मोठ्या बेमनाने तेथील व्यक्ती तयार झाला आणि तो म्हणाला मी दाखवेल तुम्ही नोंदवहिला हात लावायचा नाही. क्षितिजकांतने व्हिडीओ रेकॉर्ड करणारा गुप्त डिवाईस घेवून तेथे प्रवेश केला. नोंदवही पाहत असतांना तेथील व्यक्तीने पाच पाने उलटली आणि मागून आलेल्या काही प्रशासनातील लोकांचा धक्का क्षितिजकांतला लागला आणि डिवाईस खाली पडून बंद झाले. यादरम्यान क्षितिजकांतच्या सांगण्याप्रमाणे 267/2025 हा आकडा पाहिला. पण क्षितिजकांत सांगात मृत्यूचा की बेपत्ताचा याबाबत मी अजूनही पुर्णपणे शाश्वत नाही. परंतू आकड्याप्रमाणे प्रशासन काही तरी लपवते आहे असे माझे मत आहे. क्षितिजकांत सांगतात. मेडिकल कॉलेजमध्ये सुध्दा जवळपास अशीच परिस्थिती आहे. स्वरुपराणी हॉस्पीटलमध्ये 48 तासापुर्वी कपड्यांचे वेगवेगळे तिन ढिगार होते. ते आज नाहीत. त्या भागात फिरणारी एक खाजगी ऍम्ब्युलन्स यामध्ये सुध्दा प्रेत होते. ती अत्यंत गतीशिल वेगाने स्वरुपराणी या दवाखान्यात नेण्यात आली. त्या प्रेतावर क्रमांक दिसला नाही. कारण या अगोदर 67 क्रमांकाचे प्रेत क्षितिजकांतनेच दाखवले होते.
अभिनेत्री खा.हेमा मालनी यांनी आज पत्रकारांना दिलेल्या उत्तरांमध्ये सांगत होत्या की, प्रयागराजमध्ये काही तरी छोटसा घटनाक्रम घडला आहे. परंतू त्याला जास्तीचे वाढवून दाखविले जात आहे. गोदी मिडीयाने तर आजपर्यंत मृत्यूबद्दल बोलायला तयारी दाखवली नाही. धनकड कशी डुबकी घेत होते हे दाखवत होते. त्यांच्यामुळे कुंभमेळा कसा पवित्र झाला हे दाखवत होते आणि आज तर नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यामुळे गोदी मिडीयाला तर सायंकाळ पर्यंत हेच काम आहे. त्याचे दुसरे कारण असेही आहे की, आज दिल्ली विधानसभेचे मतदान सुरू आहे. त्या मतदानावर नरेंद्र मोदी यांच्या डुबकीचा प्रभाव पडावा हा हेतु आहे.
शंकराचार्य श्री अविधेशानंदजी सरस्वती यांनी जनतेच्या मनात असलेल्या बाजू पत्रकारांसमोर मांडल्या म्हणून शंकराचार्य हे दुसऱ्या राजकीय पक्षाचे व्यक्ती आहेत, तुमचा मर्डर करू असे त्यांच्या बद्दल बोलले जात आहे. याबद्दल महामंडलेश्र्वर श्री.प्रेमानंदजी महाराज सांगता की, चार पिठांचे शंकराचार्य हे हिंदु धर्माचे राजे आहेत. त्या पदावर बसणारा व्यक्ती हा धर्माप्रमाणेच बोलतो. त्याला राजकारणाशी काही देणे-घेणे नसते आणि महंत श्री अविधेशानंदजी सरस्वती हे तर धर्माला वगळून एक शब्द बोलत नाहीत. त्यांच्याबद्दल कोणी बोलत असेल तर त्या व्यक्तीला मुर्ख म्हणून मी आपले अस्तित्व धोक्यात आणू इच्छीत नाही.
एकूणच कुंभमेळ्यामध्ये तयार करण्यात आलेली व्हीव्हीआयपी सोय या कुंभमेळ्यात घडलेल्या घटनेची जबाबदार आहे असेच म्हणावे लागेल. क्षितिजकांत सारखा जिगरबाज गेली सात दिवस अव्याहत मेहनत करत असून कोण-कोणते सत्य जनतेसमोर मांडता येईल यासाठी आपली कोणतीच परवा न करता करत असलेल्या त्यांच्या शोध पत्रकारीतेला सलाम करून परमेश्र्वराने त्यांची सत्य शोधण्याची क्षमता वाढवावी हीच मागणी.
सोर्स: 4 पीएम.