लोकसभा आणि राज्यसभेत खा.राहुल गांधी आणि खा.मल्लीकार्जुन खरगे यांनी सरकारला धुतले

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुरू असलेल्या लोकसभा आणि राज्य सभेचेअधिवशेनात विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी आणि मल्लीकार्जुन खरगे यांनी सरकारला धुवून काढले. पहिल्यांदा राहुल गांधी बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी बसलेले होते आणि यासाठी राहुल गांधींनी त्यांना धन्यवाद दिले. 27 जानेवारीला घडलेल्या घटनेची आज ही खरी माहिती प्रसारीत न करून आपण काय साध्य करत आहात हा विषय सुध्दा आला. एकीकडे या अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, हे अधिवशेन कोणत्याही बाहेरच्या आक्रमणाशी संबंधीत नसणार. परंतू पोप्स या जागतिक यादीमध्ये भारताचा क्रमांक जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये नाही आणि इकडे नरेंद्र मोदी हे विश्र्वगुरू झाले आहेत अशी बोंब उठवण्यासाठी त्यांनी खरेदी केलेले पत्रकार तयारच आहेत. या अधिवेशनाच्या दरम्यान राज्यसभेमध्ये मल्लीकार्जुन खरगे यांनी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या पुत्राला दिलेला झटका पाहिल्यानंतर राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा चेहरा लालबुंद झाला होता.


कुंभ मेळ्यात घडलेली घटना एका अर्थाने लपविली जात आहे हे दिसतच आहे. पत्रकारांना काही पाहुल दिले जात नाही. काही रेकॉर्डींग करू दिले जात नाही. उत्तर प्रदेश सोडून मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, हरीयाणा राज्यातील अनेक ऍम्ब्युलन्स सध्या कुंभमेळा परिसरात आल्या आहेत. त्या गाड्यांमध्ये काय पाठविले जात आहे. हे गुप्तच आहे. अत्यंत जलदगतीने त्या गाड्यांना पळविले जात आहे. एवढेच नव्हे तर कचऱ्यांच्या गाड्यामध्ये पोलीस सुरक्षा आहे. आता कचऱ्यांच्या गाड्यामध्ये पोलीस सुरक्षा हा शंकेचा विषय आहेच असो. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राज्यसभेत बोलतांना खा.मल्लीकार्जुन खरगे म्हणाले मी कुुंभमेळ्यात मरण पावलेल्या हजारो जणांना श्रध्दांजली अर्पण करतो. डॉ.मनमोहनसिंग यांना सुध्दा श्रध्दांजली अर्पण करतो. यावेळेस सत्ताधाऱ्यांनी गोंधळ केला. त्यावेळी खरगे म्हणाले की, माझे चुकले असेल तर मी क्षमा मागेल. पण तुम्ही तर सांगा खरे काय आहे? किती जणांचा मृत्यू झाला आहे, किती जण गायब झाले आहेत, यावेळी सत्ताधाऱ्यांनी घातलेल्या गोंधळात सभापती जगदीप धनकड हे खरगे यांना सांगत होते की, तुमचे वाक्य परत घ्या. खरगे पुढे म्हणाले आमच्या येथे होणाऱ्या अभिभाषणात सबका साथ सबका विकास या संदर्भाने मला विचारायचे आहे की, कोणाचा साथ आणि काणेाचा विकास झाला आहे. या अभिभाषणात दोन शब्द अजून वाढले सबका विश्र्वास सबका प्रयास यामध्ये कोणाच्या विश्र्वासावर कोणाचे प्रयास आहेत हे सुध्दा मला विचारायचे. जय बापू, जय भीम, जय संविधानावर मी बोलणार आहे. दिलेले सर्व वचन पोकळेच ठरले. देशाचा शेतकरी, बेरोजगार आत्महत्या करत आहे. महागाईने देशाची कंबर मोडली आहे. काही बोटांवर मोजण्याइपत श्रीमंतांच्या विकासाची गॅरंटी सरकार घेत आहे. खरे तर अदानी, अंबांनी आणि मित्रांचा विकास म्हणजे देशाचा विकास नव्हे. खरे तर शेतकरी आणि गरीबांचा विकास म्हणजे खऱ्या अर्थाने तो विकास ठरेल. गरीब मरत आहे अशा परिस्थितीत हा अमृतकाळ आहे की, विश काळ हे एकदा मला सांगा. तेवढ्यात कोणी तरी किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अशी मध्येच आवई उठवली तेंव्हा खरगे म्हणाले मागील दहा वर्षामध्ये 1 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांना एमएसपी दिला जात नाही, शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला. आणि बेकारी वाढली आहे. यावर लक्ष देण्याची गरज सांगितली. सन 2013 मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना काय म्हणाले हे सांगतांना खरगे यांनी त्यावेळी रुपया डॉलरच्या तुलनेत 60 रुपये असतांना रुपया आयसुयीत आहे असे सांगितले होते. त्यावेळी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र निरज चंद्रशेखर यांनी खरगेवर कॉमेंट केली. तेंव्हा खरगे म्हणाले तुझ्या बापाचा साथीदार आहे. चुप बस. यावर पुन्हा गोंधळ झाला तेंव्हा खरगे म्हणाले की, मी कधीच कोणाचा जाणून-बुजून अपमान करत नाही. मी आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर एकाच वेळी कर्नाटकच्या जेलमध्ये गेलो होता. यावर घाया करत खरगे यांना आपले वाक्य परत घेण्यास सांगितले. मात्र खरगे यांनी आपले वाक्य परत घेतले नाही आणि पुढे सांगितले की, 2013 मध्ये डॉलरच्या तुलनेतील रुपयावर बोलणारे मोदी आज रुपयांची किंमत 87 झाली तेंव्हा काही बोलत नाहीत हा प्रश्न उपस्थित केला.
अनेक प्रश्न आणि उत्तर कोणतेच नाही. म्हणून सत्ताधारी मंडळी खा.राहुल गांधी, खा.मल्लीकार्जुन खरगे यांना भितात. कुंभ हे असे आहे, भव्य होणार आहे, परंत ही संधी नाही. असा प्रचार करून तेथे करोडो लोकांना बोलावले. कोणत्याही शंकराचार्यानंी किंवा महामंडलेश्र्वरांनी कुंभाचा प्रचार केला नाही. कारण कुंभ नेहमीच भले असते. हा प्रचार त्या ठेकेदारांनी केला. ज्यांनी हिंदुत्व आणि सनातनाची सुपारी घेतली आहे. आजही तेथे अनेक लोक आपल्या नातलगांना शोध आहेत. मृत्यूचा आकडा 30 कायमच आहे. किंमती जखमी आहेत यांची संख्या माहित नाही. अनेक गाड्या तेथे बेवारस उभ्या आहेत. कोणाच्या आहेत त्या गाड्या, का येत नाहीत लोक त्या गाड्या घेण्यासाठी असे असंख्य प्रश्न आहेत. कुंभमेळ्यात एआयचे हजारो कॅमेरे आहेत. त्याच्यात पाहुन सांगा. आयोध्येत अनुसूचित जातीच्या युवतीवर अत्याचार करून तिचे डोळे काढले. याबद्दल सरकार काही बोलत नाही. राजस्थानमध्ये एक अनुसूचित जातीचा युवक घोड्यावर बसून लग्न करण्यासाठी जात असतांना वरातीपेक्षा चार पट शस्त्र पोलीस तेथे लावावे लागले. खरे तर आजच्या सत्ताधाऱ्यांनी स्वातंत्र्य आ ंदोलनात गद्दारी केलेली आहे. आज आम्ही ज्या हक्कांवर जगतो आहोत. ते हक्क भारतीयांना पंडीत जवाहरलाल नेहरु आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत.
याबाबत लोकसभेत बोलतांना खा.राहुल गांधी पण म्हणाले होते, तुम्ही संविधानाच्या मुल्यांना डावलले आहे, तुम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मुल्यांना डावलले आहे. तरी नाव घेता त्यांचेच. तुमचा विदेश मंत्री निमंत्रण आणण्यासाठी अमेरिकेत गेला. आमचे सरकार असते तर आम्ही असा विदेशमंत्री पाठवला नसता. तेंव्हा सभागृहात गोंधळ झाला आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिडला यांनी तुम्ही स ांगत असलेल्या घटनेचे पुरावे द्यावे लागतील असे सांगितले. राहुल गांधी म्हणाले उत्पादन क्षेत्र मागे पडले आहे. जीडीपी दर खाली पडला आहे. तसेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेची निवडणुक झाल्यानंतर पाच महिन्यात 70 लाख मतदार वाढविण्यात आले आहेत. शिर्डी या विधानसभा मतदार संघात एकाच इमारतीच्या नावावर 7 हजार मतदान कार्ड तयार केले. ही इमारत प्रवरा शिक्षण संस्थेची आहे. अशा परिस्थिती सध्या लोकसभा अणि राज्यसभेचे कामकाज सुरू आहे. देशातील जनतेच्या भल्यासाठी निर्णय घेण्याच्या या सभागृहांमध्ये विरोधी पक्षांना बोलू दिले जात नाही. किती है दुरदैव. पोप्स या पत्रिकेने जारी केलेल्या जगातील देशांच्या यादीमध्ये भारताचे नाव नाही. परंतू आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्र्वगुरू आहेत. याचा डांगोरा पिटण्यासाठी खरेदी केलेले बरेच पत्रकार आपली पायताणे झिजवत आहेत.
सोर्स:4 पीएम आणि आर्टीकल 19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!