नांदेड(प्रतिनिधी)-मौजे इटग्याळ (प.दे.) ता.मुखेड येथे घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 27 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच माहूर येथील ब्राम्हणगल्ली असलेले घरफोडून चोरट्यांनी 50 हजारांची ऐवज चोरला आहे. हरडप ता.हदगाव येथील लग्नातून 70 हजार रुपये सोन्याचे दागिणे चोरीला गेले आहेत.
केवळाबाई कोंडीबा देवकत्ते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 फेबु्रवारी रोजी ते आणि त्यांचा मुलगा आपल्या घरास कुलूप लावून भावाच्या घरी झोपण्यासाठी गेले होते. 3 फेबु्रवारीला सकाळी 6 वाजता परत आले तेंव्हा त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले होते. कपाटत ठेवलेले रोख 70 हजार रुपये आणि सोन्या चांदीचे दागिणे 3 लाख 57 हजार 500 रुपयांचे असा एकूण 4 लाख 27 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. मुक्रामाबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 18/2025 नुसार दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक तिडके अधिक तपास करीत आहे.
पवनकुमार शिवराम कोंडे रा.माहूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 फेबु्रवारीच्या सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेदरम्यान ब्राम्हणगल्ली माहूर येथील त्यांच्या घराचा कडीकोंडा कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि घरातील बॅगमध्ये ठेवलेले 20 हजार रुपये रोख रक्कम आणि 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे असा 50 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. माहूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 17/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस अंमलदार चौधरी अधिक तपास करीत आहेत.
हरडप येथील शिवाजी दत्तराव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 फेबु्रवारी रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास त्यांची नातेवाईक गौरी गोविंद गायकवाड यांनी लग्नात परिधान केलेले 70 हजार रुपये किंमतीचे दागिणे कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेले आहे. हदगाव पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 20/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक नंद अधिक तपास करीत आहेत.
इटग्याळ येथे 4 लाख 27 हजारांची चोरी, माहूरमध्ये घरफोडले, हरडफ येथे लग्नात दागिणे चोरी
