नांदेड (प्रतिनिधी)-दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ९.४० वाजता दातार चौक या भागातून बालाजी धोंडीबा मच्छरलावार हे ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना आम्ही पोलीस आहोत, असे बनावट ओळखपत्र दाखविले आणि त्यांच्या गळ्यात असलेले लॉकेट व सोन्याची अंगठी काढायला लावली. आणि ते १ लाख ५ हजार रुपयांचे साहित्य एका कागदाच्या पुडीत बांधून त्यांना परत दिले. बालाजी मच्छरलावार यांनी ती कागदाची पुडी उघडून पाहिली असता ज्यात फक्त खडे होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे तक्रार दिली. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा क्र.३५/२०२५ दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर गावंडे अधिक तपास करीत आहेत.
More Related Articles
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर तात्काळ उपाय योजना कराव्यात-खा.वसंतराव चव्हाण
नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्यावरच जनावरांच्या चारा…
‘ज्ञानतीर्थ-२०२५’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव – जलसा
नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड…
खाजगी शिक्षकांचे प्रलंबित सर्व प्रश्न मार्गी लावू – खा.चव्हाण
नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील खाजगी संस्थेमध्ये कार्यरत असणार्या शिक्षकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यात…
